After Divorce from Hardik Pandya Natasa Stankovic Found New love Esakal
Premier

Hardik Pandya-Natasa Stankovic: हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशा पुन्हा प्रेमात? चाहत्यांनी उलगडला 'त्या' कमेंटचा नेमका अर्थ

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce: नताशा अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलासोबत मजा करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. गेल्या काही काळापासून नताशा तिच्या हॉट लूकने चाहत्यांची मने जिंकत आहे.

आशुतोष मसगौंडे

After Divorce from Hardik Pandya Natasa Stankovic Found New love:

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच वेगळे झाले असून, दोघांचे ४ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. घटस्फोट घेऊन ते आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दरम्यान नताशाने चाहत्यांना ती तिच्या नवीन आयुष्यात खूप आनंदी असल्याचा तिच्या आयुष्यात प्रेम आल्याचा मोठा पुरावा दिला आहे.

हार्दिकला विसरून नताशाचे आता दुसऱ्या कोणावर तरी आपला जीव लावला आहे. असे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

हे सर्व नताशाच्या इंस्टाग्रामवरून लीक झाले आहे. तिच्या नव्या नात्याची, तिच्या नव्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

नताशा अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुलासोबत मजा करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. गेल्या काही काळापासून नताशा तिच्या हॉट लूकने चाहत्यांची मने जिंकत आहे.

नताशाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूपच स्मार्ट दिसत आहे. अशाच एका व्यक्तीने त्यावर कमेंट केली आणि संपूर्ण सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. ती व्यक्ती म्हणजे अलेक्झांडर ॲलेक्सबद्दल.

अलेक्झांडरने नताशाच्या फोटोवर एक प्रेमळ कमेंट केली. अलेक्झांडर ॲलेक्सने नताशाच्या फोटोवर फायर इमोजी कमेंट केली आहे. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे असे दिसते, युजर्स म्हणत आहेत.

दोघांनाही हे सार्वजनिकरित्या करायचे नसले तरी, कमेंट केल्यानंतर युजर्सनी त्यांच्यामध्ये काहीतरी असल्याची चर्चा सुरू केली आहे. याआधीही जेव्हा नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या, तेव्हा नताशा आणि अलेक्झांडर ॲलेक्स एकत्र दिसले होते.

Natasa Stankovic

नताशाच्या फोटोवर अलेक्झांडर ॲलेक्सच्या कमेंटनंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "प्रेम विसरणे खरच इतके सोपे आहे का?" दुसऱ्याने लिहिले, नताशा तू योग्य केलेस. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार आहे.”

तिसऱ्याने लिहिले की, हार्दिक पांड्या जस्मिन वालियासोबत आहे आणि तू अलेक्झांडर ॲलेक्ससोबत पुढे जात आहेस." आणखी एका यूजरने लिहिले की, जर तुम्हा दोघांना वेगळे व्हायचे होते तेव्हा तुम्ही लग्न का केले आणि तेही तीन धर्मांच्या पद्धतीने.

नताशा आणि अलेक्झांडर ॲलेक्स यांचा चांगला बॉन्ड आहे. दोघांचे अनेक फोटो एकत्र येत राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT