Bajrangi Bhaijan Esakal
Premier

Bajrangi Bhaijan : सिनेमाच्या क्लायमॅक्समधील 'जय श्री राम' हर्षालीच्या नाही तर या मुलीच्या आवाजात झालंय रेकॉर्ड

Harshali Malhotra in Bajrangi Bhaijan : सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमात अभिनेत्री हर्षाली मल्होत्राच्या शेवटच्या सीनबाबतचा एक महत्त्वाचा किस्सा कबीर खान यांनी शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Bajrangi Bhaijan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे (Salman Khan) अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत पण आजवरचा त्याचा खूप गाजलेला सिनेमा म्हणजे 'बजरंगी भाईजान.' अतिशय गाजलेल्या या सिनेमातील पवन आणि त्याला सापडलेली लहान मुलगी मुन्नी यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने सिनेमात मुन्नीची भूमिका साकारली होती. ही तिची भूमिका खूप गाजली आणि या सिनेमात तिच्यावर चित्रित केलेला शेवटचा सीनही चर्चेत राहिला.

या सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये मुन्नी पवनला हाक मारताना जय श्री राम म्हणते असं दाखवण्यात आलं होतं पण तुम्हाला माहितीये का ? हा संवाद कोणत्यातरी वेगळ्याच मुलीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी हा किस्सा नुकताच एका मुलाखतीमध्ये शेअर केला.

म्हणून, दिग्दर्शकाने बोलावलं लेकीला...

'चंदू चॅम्पियन' सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकतीच मॅशेबल इंडियाच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा किस्सा शेअर केला. ते म्हणाले,"सिनेमातील साऊंड मिक्सिंगचा शेवटचा दिवस होता आणि जवळपास ११ वाजता माझ्या टीमच्या लक्षात आलं कि हर्षालीने जो शेवटी जय श्री राम संवाद म्हंटलाय त्याचा आवाज नीट नाहीये. त्यांनी थोडा नीट करून पहिला पण ते व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. माझी मुलगी सायरा त्या वेळी सहा वर्षाची होती. मी माझ्या बायकोला मिनीला फोन लावला आणि सायराला स्टुडिओला घेऊन यायला सांगितलं, हर्षालीला एवढ्या रात्री स्टुडिओमध्ये आणणं शक्य नव्हतं. मग सायराने तो शेवटचा डायलॉग म्हंटला."

सिनेमाची करोडोची कमाई

बजरंगी भाईजान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ९६९ करोड रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात सलमान आणि हर्षाली यांच्याबरोबर करिना कपूर आणि नवाजुद्दीन शेख यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले होते.

हर्षाली मल्होत्रा या सिनेमामुळे सुपरहिट झाली. आजही अनेकजण तिला मुन्नी या नावानेच ओळखतात. लवकरच ती सिनेविश्वात पदार्पण करणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT