Hema Malini posting an emotional tribute on social media shortly after Dharmendra’s demise — first reaction from the actress.

 

esakal

Premier

Hema Malini emotional Post : ''धरमजी माझ्यासाठी खूप काही होते...'' ; हेमा मालिनी भावनिक पोस्ट करत पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

Hema Malini Social Media Post : हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास फोटो देखील या पोस्टबरोबर शेअर केले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Hema Malini’s First reaction on Social Media after Dharmendra death : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘हीमॅन’ अशी ओळख असणारे धर्मेंद्र देओल यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधानाने केवळ त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीसह देशभरातील लाखो चाहत्यांना प्रचंड दु:ख झाले आहे. यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक अभिनेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्या घरी जाऊन देओल कुटुंबीयांची भेट घेत आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आतापर्यंत देओल कुटुबातील सदस्यांपैकी कुणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. मात्र आता धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि भाजप खासदार हेम मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास फोटो अन् पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेमा मालिनी यांची ही पोस्ट वाचून त्या दोघांमधील अतूट प्रेमाची आपल्याला जाणीव होते.

हेमा मालिनींनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? -

एक्सवर फोटोंसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये हेमा मालिनी म्हणतात, ''धरमजी, माझ्यासाठी खूप काही होते. प्रिय पती, आमच्या दोन मुली, ईशा आणि अहना यांचे प्रिय पिता, मित्र, तत्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी, गरजेच्या प्रत्येक वेळी माझे जवळचे व्यक्ती, खरंतर माझ्यासाठी ते सर्व काही होते. प्रत्येकवेळी चांगल्या आणि वाईट काळात ते माझ्यासोबत होते. त्यांनी आपल्या सहज, मैत्रिपूर्ण वागणुकीतून माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना आपलेसे केले होते. नेहमीच त्या सर्वांमध्ये प्रेम आणि रस दाखवत होते. एक पब्लिक पर्सनॅलिटी म्हणून त्यांचे टॅलेंट त्यांची लोकप्रियता असतानाही त्यांची विनम्रता आणि त्यांच्या यूनिव्हर्सल अपीलने त्यांना सर्व दिग्गजांमध्ये एका यूनिक आयकॉन म्हणून वेगळे बनवले.''

आपल्या पोस्टमध्ये हेमा मालिनी पुढे म्हणतात, ''फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच असणारी त्यांची प्रसिद्धी आणि यश कायम राहील. माझे वैयक्तिक नुकसान शब्दांमध्ये मांडता येणार नाही आणि जी पोकळी  निर्माण झाली आहे, ती काही अशी ही जी माझ्या उर्वरीत आयुष्यात राहील. वर्षानुवर्षे सोबत राहिल्यानंतर माझ्याकडे अनेक खास क्षणांना पुन्हा जगण्यासाठी खूप आठवणी उरल्या आहेत.''

यानंतर त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील प्रेमाची झलक स्पष्टपणे दिसते. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘’काही संस्मरणीय आठवणी..’’ तसेच हेमा मालिनी यांनी तिसरी पोस्टही शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, इतक्य़ा वर्षांपासून सोबत- नेहमीच आपल्यासाठी, काही खास क्षण...’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Rajgad News : पानशेत–वरसगाव धरण परिसरात खळबळ; ३०० हून अधिक जणांना नोटिसा; ४० पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाई!

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Manchar Election : मंचरमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्राची थोरात यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; संजय थोरात!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT