Sabyasachi And Manish Malhotra Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : म्हणून, अंबानी कुटूंबाने लग्नात सब्यासाची नाही तर मनीष मल्होत्राच्या डिझाईन्सला दिली पसंती ; हे आहे त्यामागील अर्थकारण

Reason behind Ambani skipped Sabyasachi for wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड विवाहसोहळ्याला अंबानी कुटूंबाने वेडिंग स्पेशालिस्ट डिझायनर सब्यसाची ऐवजी मनीष मल्होत्राला पसंती दिली. काय आहे यामागील अर्थकारण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुप्रतीक्षित ग्रँड विवाहसोहळा काल १२ जुलैला शाही थाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला अक्षरशः तारांगण रेड कार्पेटवर अवतरलं होतं असं म्हणायला हरकत नाही. रेड कार्पेटवरील झगमगाट, भारतीय पोशाखांमधील लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स याचा जणू एक खास फॅशन शोचं यावेळी पाहायला मिळाला. इतकंच नाही तर अंबानी कुटूंबाने लग्नावेळी घातलेले आऊटफिट्सही चर्चेत राहिले आणि हे सगळे आऊटफिट्स डिझाईन केले होते बॉलिवूडचा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने.

वेडिंग स्पेशालिस्ट म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण करणाऱ्या सब्यासाची मुखर्जी यांच्याऐवजी मनीष मल्होत्राची निवड अंबानी कुटूंबाने का केली ? सब्यसाची आणि अंबानी कुटूंबामध्ये काही वैयक्तिक तणाव आहे का ? असा प्रश्नही यावेळी चर्चेत राहिला. पण तसं काहीही नसून यामागे शुद्ध अर्थकारण आहे. कोणत्याही दोन उद्योजकांमध्ये असलेली स्पर्धा या लग्नात सब्यासाचीच्या डिझाइन्सची गैरहजेरी असण्यामागचं प्रमुख कारण आहे.

काय आहे कारण ?

रेडीट या सोशल मीडियावर केलेल्या गेलेल्या पोस्टनुसार अंबानी यांनी सब्यासाचीचे डिझाईन असलेले कपडे लग्नात घातले नाहीत यामागे बिझनेस हे महत्त्वाचं कारण आहे. या चर्चेदरम्यान अनेक युझर्सनी ही गोष्ट लक्षात आणून दिली कि, ही एक प्रकारची व्यावसायिक चाल होती. उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या कंपनीचे लेबल सब्यासाची या सब्यासाची यांच्या ब्रँडमध्ये ५१% गुंतवणूक शेअर्स मार्फत केली आहे.

2021 मध्ये, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडने सब्यसाची कॉउचरद्वारे चालवलेल्या लेबलमध्ये 51% व्याजासाठी 398 कोटी रुपये दिले. त्याच वर्षी, मुकेश अंबानी यांनी लोकप्रिय फॅशन डिझायनर्सच्या लेबल्समध्येही मोठी गुंतवणूक केली.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) ने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या मालकीच्या एमएम स्टाइल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत 40% हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शवली. इतकेच नाही तर रिलायन्सने रितू कुमारच्या लोकप्रिय डिझायनर लेबलमध्ये 52% हिस्सा विकत घेतला.

एका वर्षानंतर 2022 मध्ये, Reliance Brands Ltd (RBL) ने देशातील आघाडीचे डिझायनर्स अबू जानी संदीप खोसला (AJSK) मध्ये 51% स्टेकसाठी गुंतवणूक केली. म्हणजेच अंबानी यांनी या लग्नाचा विचार करून एका दगडात दोन पक्षी मारले.

म्हणूनच, या लग्नात हजर राहिलेल्या बऱ्याच पाहुण्यांनी कपडेही मनीष मल्होत्रा, रितू कुमार, अबू जानी, संदीप खोसला यांच्या लेबलचेच असलेले पाहायला मिळाले. या लग्नसोहळ्यातून अंबानी यांनी आधी केलेल्या गुंतवणुकीतून एक मोठा नफा मिळवला असावा असं म्हणता येईल.

काल १२ जुलैला अनंत राधिकाच्या लग्नाचे विधी पार पडले आणि आज १३ जुलैला त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे आणि उद्या १४ जुलैला त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनसाठी जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये एका ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT