Ranveer Singh:  sakal
Premier

Ranveer Singh: हॉलीवूड अभिनेत्यांनी केलं रणवीर सिंगचं कौतुक, वाचा काय म्हणाले ते दिग्गज!

Bollywood Marathi News: ह्यू जॅकमन स्टारर चित्रपट डेडपूल अँड वूल्व्हरिन या महिन्यात २६ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाल वृत्तसेवा

Hollywood News : हॉलीवूड अभिनेते रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. खरं तर त्यांचा डेडपूल अँड वूल्व्हरिन हा ॲक्शन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा परिस्थितीत हे अभिनेते आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत

अलीकडेच ह्यूने एका मुलाखतीत क्रिकेटर रोहित शर्माचे कौतुक केले होते, तर आता रायन रणवीर सिंगबद्दल बोलताना दिसला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनीही पसंती दिली आहे. रणवीरने ६ जुलै रोजी त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा केला आहे. अशा परिस्थितीत मार्वल इंडियानेही त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे,

ज्यामध्ये हॉलीवूड स्टार रायन रेनॉल्ड्स त्याच्याबद्दल बोलताना आणि त्याचे कौतुक करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की होस्ट रायनला विचारतो की, त्याला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल.

हा प्रश्न ऐकल्यानंतर, तो काही क्षणातच रणवीर सिंगचे नाव घेतो आणि म्हणतो की तो खूप आश्चर्यकारक आणि मजेदार आहे. पुढे तो म्हणतो की त्याने डेडपूलमध्येही आवाज दिला आहे. रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन स्टारर चित्रपट डेडपूल अँड वूल्व्हरिन या महिन्यात २६ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House Lottery: म्हाडा 'त्या' विजेत्यांची पुन्हा लॉटरी काढणार! कारण आलं समोर

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

मुलगा झाला हो ! ऐन दिवाळीत राघव - परिणितीने दिली आनंदाची बातमी

Thane News: नागरिकांनो सावधान! दिवाळीच्या उत्साहात पाकिटमारांचा हैदोस, पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाचा विकास ठप्प; प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपासून नाही

SCROLL FOR NEXT