kim kardashian eSakal
Premier

Kim Kardashian: किम कार्दशियन मुंबईच्या ऑटोरिक्षाच्या प्रेमात; तिची 'ती' मागणी पूर्ण करण्यावरून प्रशासनात गोंधळाची स्थिती

Hollywood star kim kardashian in Mumbai: प्रसिद्ध हॉलीवूड सेलिब्रिटी असलेली किम कार्दशियनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- जागतिक कीर्तीची हॉलीवूड स्टार किम कार्दशियन मुंबईतील ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली आहे. किमला प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलजवळ ऑटोरिक्षासह फोटोशूट करायचे आहे; मात्र दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षाला परवानगी नसल्याने ती मिळविण्यासाठी प्रॉडक्शन हाऊसची पळापळ सुरू आहे. ती परवानगी देण्यावरून परिवहन आणि वाहतूक विभागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोण आहे किम कार्दशियन?

प्रसिद्ध हॉलीवूड सेलिब्रिटी असलेली किम कार्दशियनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. किमने स्वतःचा सौंदर्य, प्रसाधनांचा ब्रँड विकसित केला असून त्याचे बाजारमूल्य चार अब्ज डॉलर आहे. टाईम्स मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्येही तिचा समावेश आहे.

मुंबईत पाहिजे रिक्षा मला...

उद्योगपती अनंत अंबानीच्या विवाहासाठी किम मुंबईत आली आहे. त्यासोबत तिला मुंबईत फोटोशूटही करायचे आहे. हे चित्रीकरण लालबाग मसाला मार्केट, सिद्धिविनायक मंदिर आणि ताज हॉटेल परिसरात करायचे आहे. ताज परिसरातील फोटोशूटसाठी तिला ऑटोरिक्षा हवी आहे; परंतु दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षा चालविण्यास परवानगी नसल्याने फोटोशूट अडचणीत आले आहे.

संबंधित प्रॉडक्शन हाऊसने कुलाबा वाहतूक पोलिसांकडे त्यासाठी परवानगी मागितली; मात्र त्यांनी परिवहन विभागाकडे परवानगी घेण्याचा सल्ला दिला. ऑटोरिक्षा प्रत्यक्षात चालवली जाणार असेल, तरच आमची परवानगी गरजेची आहे; अन्यथा वाहतूक पोलिसांची परवानगी घ्या, असे परिवहन विभागाने म्हटले आहे.

कधी होणार फोटोशूट ?

किम कार्दशियन ताज महाल पॅलेसमध्ये उतरली आहे. अनंत अंबानीचा विवाह सोहळा १२ जुलैला झाल्यानंतर १३ जुलै रोजी किमचे फोटोशूट होण्याची शक्यता आहे.

ऑटोरिक्षा चालवली जाणार असेल किंवा तिचा व्यावसायिक वापर केला जाणार असेल तरच रिक्षा शूटिंगसाठी परिवहन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते; अन्यथा नाही, असं परिवहन विभागाचे सहआयुक्त जे. बी. पाटील म्हणाले आहेत. दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षाचा फोटोशूटसाठी वापर करण्याबाबत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही, असं वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT