Heeramandi esakal
Premier

Heeramandi: 'हिरामंडी'मधील उस्ताद जींचे काम बघून खुश झाले संजय लीला भन्साळी; दिलं 'हे' खास गिफ्ट

Heeramandi: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये इंद्रेश यांनी हिरामंडी या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Heeramandi: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हिरामांडी' (Heeramandi) ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या वेब सीरिजमधील कलाकारांचे अनेकांनी कौतुक केले. अशातच आता या वेब सीरिजमधील उस्ताद जी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणारे अभिनेते इंद्रेश मलिक यांचेही सध्या कौतुक होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये इंद्रेश यांनी हिरामंडी या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

कसं झालं कास्टिंग?

हिरामंडी या वेब सीरिजमध्ये कास्टिंग कसं झालं? याबद्दल इंद्रेश मलिक यांनी एका मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, "मला श्रुती महाजन यांचा फोन आला. हे पात्र काय आणि कसं आहे, हे त्यांनी मला सांगितलं. माझे अर्धे काम तिथेच झाले आहे. दिग्दर्शकाला काय हवे आहे, निर्मिती आणि दिग्दर्शकाने व्यक्तिरेखेचा कसा विचार केला आहे? हे नेहमी समजून घेतले पाहिजे. मी माझ्या भूमिकेबाबत काही सल्ले दिले होते, ते त्यांनी मान्य केले. याचा मला आनंद झाला. त्यामुळे काम करताना जास्त संघर्ष करावा लागला नाही."

संजय लीला भन्साळींनी दिलं खास गिफ्ट

इंद्रेश मलिक यांनी पुढे सांगितलं, "वेब सीरिजमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये सोनाक्षी जी मला नाकात नथ घालायला लावते. ती प्रेमाने हे करते. सरांनी मला या सीनचा अर्थ काय आहे? मला सीनमध्ये काय करायचे आहे? हे समजावून सांगितले. त्या सीनमध्ये मला रडू आलं होतं. तो सीन करून मी फ्रेमच्या बाहेर पडलो तेव्हा देखील माझे रडणे थांबले नाही, 5 मिनिटे मी चालत होतो. सर्वजण माझ्याकडे आले. मग सर माझ्या जवळ आले. त्यांनी मला विचारलं, काय झाले? आणि मग त्यांनी मला मिठी मारली. त्यांनी मला पहिल्यांदा 500 रुपये दिले आणि हे तुझ्यासाठी आहेत, असे सांगितले. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. 500 रुपयांची नोट एका गुरूने आपल्या शिष्याला दिली, ही खूप छान गोष्ट आहे.माझे भाग्य आहे की मला संजय सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली."

'हिरामंडी' या वेब सीरिजच्या प्रीमियरमध्ये दिग्दर्शक भन्साळींनी इंद्रेश मलिकला मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर किस केलं. याबद्दल बोलताना इंद्रेश म्हणाले, "मला हे अपेक्षित नव्हते. माझ्यासोबत हे घडले याचा मला खूप आनंद झाला. मला अश्रू अनावर झाले होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

SCROLL FOR NEXT