IPL match esakal
Premier

IPL match: आयपीएल मॅच दरम्यान चक्क फोनमध्ये मालिका बघत होती तरुणी; स्टेडियममधील फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

IPL match: आयपीएल मॅचदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी आयपीएल मॅच सुरु

priyanka kulkarni

IPL match: सध्या संपूर्ण देशात आयपीएलची (IPL) क्रेझ बघायला मिळत आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलची मॅच आवडीनं बघत आहेत. आयपीएल मॅचचे तिकीट मिळवण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. अशातच आता आयपीएल मॅचदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी समोर आयपीएल मॅच सुरु असताना मोबईलमध्ये लोकप्रिय मालिका बघताना दिसत आहे.

फोटो व्हायरल

ट्विटरवर (X) एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक तरुणी आयपीएल मॅचदरम्यान फोनमध्ये फ्रेंड्स ही लोकप्रिय मालिका बघताना दिसत आहे. या तरुणीच्या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "विश्वास बसत नाही की, ही मुलगी आयपीएल सामन्यादरम्यान फ्रेंड्स बघत आहे."

फोटो पाहून नेटकरी चक्रावले

आयएपीएल मॅचदरम्यानचा तरुणीचा फोटो पाहून नेटकरी चक्रावले आहेत. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हे अविश्वसनीय नाहीये. फ्रेंड्स बघणे हे अनेकांसाठी एखादी थेरिपी घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्या मुलीला मी दोष देणार नाही!" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "काहीजण फक्त कॅमेऱ्यात कैद होण्यासाठी मॅच बघायला जातात."

IPL match

"या लोकांना मॅचचं तिकीट देऊ नका!" अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं व्हायरल झालेल्या फोटोला केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला चार हजारपेक्षा जस्त लाइक्स मिळाले आहेत.

'फ्रेंड्स' आजही लोक आवडीनं बघतात

फ्रेंड्स ही टीव्ही मालिका प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. फ्रेंड्स ही एक विनोदी मालिका आहे. यामध्ये रेचल,मोनीका,फिबी,जोई, चँडलर, रॉस यांचा कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेत रेशल ग्रीन,कोर्टनी कॉक्स,लिसा कुड्रो, मॅट लब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : पायाभूत प्रकल्प तातडीने मार्गी लावा - मुख्यमंत्री

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

SCROLL FOR NEXT