Irrfan Khan esakal
Premier

Irrfan Khan: "तुम्हाला वचन देतो बाबा..."; वडिलांसाठी बाबिल खानची भावनिक पोस्ट

Irrfan Khan: इरफानचा मुलगा बाबिलने (Babil Khan) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Irrfan Khan: दिवंगत अभिनेता इरफान खाननं (Irrfan Khan) त्याच्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. इरफाननं चार वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला होता. उद्या (29 एप्रिल) त्याची डेथ अॅनिवर्सरी आहे. याआधी इरफानचा मुलगा बाबिलने (Babil Khan) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

बाबिलची पोस्ट

बाबिलनं इरफानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुम्ही मला योद्धा व्हायला शिकवले, तसेच प्रेम आणि दयाळूपणा देखील त्यांनी मला शिकवला. तुम्ही मला आशा शिकवली आणि मला लोकांसाठी लढायला शिकवले. तुमचे चाहते हे तुमचे एक कुटुंब आहे आणि मी तुम्हाला वचन देतो बाबा, तुम्ही मला बोलावेपर्यंत मी आपल्या लोकांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लढेन. मी हार मानणार नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे."

काही दिवसांपूर्वी देखील बाबिलने इरफानबाबत एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यानं लिहिलं, "कधी कधी मला हार मानावीशी वाटते आणि सगळं सोडून बाबांकडे जावंसं वाटतं" नंतर बाबिलनं ही पोस्ट डिलीट केली.

29 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी इरफानने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. इरफाननं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अंग्रेजी मिडीयम,पिकू,पान सिंग तोमर या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

इरफानचा मुलगा बाबिल हा देखील अभिनेता आहे. बाबिलनं कला, फ्रायडे नाइट प्लॅन या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यानं द रेल्वे मॅन या वेब सीरिजमध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT