Irrfan Khan esakal
Premier

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Irrfan Khan: इरफाननं अभिनय क्षेत्रात येण्याआधी इरफाननं काही काळ एसी रिपेअरिंग करण्याचं काम देखील केलं होतं. एकदा तो चक्क अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या घरचा एसी दुरुस्त करण्यासाठी गेला होता.

priyanka kulkarni

Irrfan Khan: दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं (Irrfan Khan) प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. इरफाननं चार वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. इरफानच्या निधनानं त्याच्या चाहत्यांवर आणि सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला. निखळ अभिनय आणि डोळ्यात चमक असं व्यक्तिमत्व इरफानचं होतं. त्याचं नाव आजही घेतली की, तरी डोळ्यासमोर येतात त्याचे एकापेक्षा चित्रपट. चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी इरफाननं बरीच मेहनत घेतली होती. इरफाननं अभिनय क्षेत्रात येण्याआधी इरफाननं काही काळ एसी रिपेअरिंग करण्याचं काम देखील केलं होतं. एकदा तो चक्क अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या घरचा एसी दुरुस्त करण्यासाठी गेला होता, हे अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात संपूर्ण किस्सा....

राजेश खन्नाच्या घरी एसी दुरुस्त करायला गेला होता इरफान

इरफानने एकदा एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. तो म्हणला की, मी टेक्निकल ट्रेनिंग घेत होता. त्यामुळे मी जयपूरमधून मुंबईला आला होतो. त्यानंतर मी विविध घरांमध्ये एअर कंडिशन रिपेअर करण्याचं काम करण्यास सुरुवात केली.

पुढे इरफाननं सांगितलं, "मला अजूनही आठवते की, जेव्हा मी राजेश खन्ना यांच्या घरी एसी दुरुस्त करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा एका बाईने दरवाजा उघडला, ती म्हणाली ‘कोण?’ मी म्हणालो ‘एसी रिपेअरिंगला आलो आहे.’ ती म्हणाली ‘ये’. मग मी त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर मी जयपूरला गेलो. माझ्या वडिलांनी माझी कोणाशी तरी ओळख करून दिली आणि मला पंख्याच्या दुकानात बसवले."

इरफाननं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

सलाम बॉम्बे,मुझसे दोस्ती करोगे, बड़े इरादे, कसूर,द बायपास, मकबूल, चरस,रोग, चेहरा, द किलर, द नेमसेक, लाइफ इन अ... मेट्रो, संडे, मुंबई मेरी जान, सात खून माफ, द लंचबॉक्स, पिकू, मदारी, राबता, कारवां, करीब करीब सिंगल, हिंदी मीडियम आणि अंग्रेजी मीडियम या इरफानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Latest Marathi News Updates Live: अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका: “महापालिकेच्या भीतीने एकत्र आले तरी पराभव ठरलेलाच”

PM Narendra Modi: पूराच्या वेदनेत दिलासा ठरली मोदींची भेट; निकिताच्या अश्रूंनी पंतप्रधानांचे मन हेलावले

Pitru Paksha 2025: पितरांची मृत्यू तिथी माहिती नाही? 'या' अमावास्येला करा श्राद्ध, मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद

Nashik News : सुरक्षित अन्न खा, आरोग्य जपा; नाशिक ‘एफडीए’ची सणासुदीच्या काळात विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT