isha kpoppikar sakal
Premier

अभिनेत्याचा सेक्रेटरी हात मुरगळायचा, चुकीचा स्पर्श... अभिनेत्रीने १८ व्या वर्षी केला कास्टिंग काऊचचा सामना

Isha koppikar Casting Couch: एकदा तर एका नावाजलेल्या अभिनेत्याने तिला एकट्यात भेटायला बोलावलं होतं.

Payal Naik

मनोरंजन क्षेत्रात कास्टिंग काऊच प्रकरण काही वर्षांपूर्वी चर्चेत आलं होतं. अनेक अभिनेत्री पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेला प्रकार उघडपणे बोलू लागल्या होत्या. अनेक अभिनेत्रींना सिनेक्षेत्रात येताना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलाय. अनेक अभिनेत्री यावर समोर येऊन खुलेपणाने बोलल्यात तर काहींनी यावर अनेक वर्षे मौन बाळगून त्यानंतर त्या समोर आल्यात. नुकतच अभिनेत्री ईशा कोपिकरनेही तिच्या सोबत झालेल्या कास्टिंग काऊच प्रकरणाचा खुलासा केलाय. करियरच्या सुरुवातीच्या काळातच ईशाला चूकीच्या गोष्टींचा सामना करावा लागल्याचं ती म्हणाली..

एकता कपूरनेही दिलेला सल्ला

नुकत्याच एका प्रसिद्ध डिजीटल पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोपिकरने तिच्या सोबत घडलेल्या कास्टिंग काऊच घटनांबद्दल सांगितलं आहे. ईशा कोपिकर १८ वर्षांची असतानाच तिला या गोष्टींना सामोरं जाव लागलं होतं. मुलाखतीत ती सांगते की, "मी १८ वर्षांची होते, जेव्हा एक सेक्रेटरी आणि अभिनेत्याने मला कास्टिंग काऊचचासाठी विचारलं होतं. त्यांनी म्हंटलं होतं की कामासाठी तुम्हाला अभिनेत्यासोबत फ्रेंडली रहावं लागेल. माझा स्वभाव फ्रेंडली आहे पण फ्रेंडली असल्याचा अर्थ काय ? एकदा तर एकता कपूरने पण मला थोडा एटिट्यूड ठेवण्याचा सल्ला दिला होता.'

अभिनेत्यासोबत फ्रेंडली व्हावं लागेल

एवढच नाही तर ईशाने आणखी एका घटनेचा उल्लेख केला. २३ वर्षांची असतानाही ईशाला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. ती म्हणते की, "मी २३ वर्षांची असताना मला एका अभिनेत्याने एकटं भेटायला बोलावलं होतं. त्या अभिनेत्याने सांगितलं की माझ्याबद्दल आधीच खूप अफवा आहेत. म्हणूनच त्याने मला एकटं भेटायला बोलावलं. पण मी एकटं भेटण्यास नकार दिला आणि सांगितलं की मी एकटी नाही येऊ शकत." यावर ईशाने सांगितलं की तो अभिनेता नामवंत अभिनेता होता. याबद्दल ती पुढे म्हणते की, "अभिनेता आणि दिग्दर्शकांचे सेक्रेटरी यायचे, चूकीच्या पद्धतिने स्पर्श करायचे, हाथ मुरगळायचे आणि वाईट पद्धतिने बोलायचे की अभिनेत्यासोबत फ्रेंडली व्हावं लागेल."

अभिनेत्री म्हणून काम करताना अनेकदा आपल्या वयापेक्षा जास्त वय असलेल्या अभिनेत्यासोबतही काम करावं लागतं. हा अनुभवही तिने या मुलाखतीत शेयर केलाय."जेव्हा तुम्ही तुमच्या वयापेक्षा २०, ३० वर्षे जास्त वय असलेल्या अभिनेत्यासोबत काम करताना तुम्हाला विचीत्र वाटतं. जेव्हा मी अशा ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत काम करायची तेव्हा विचीत्र वाटायचं. असं वाटायचं की तुम्ही तुमच्या वडिलांना मिठी मारताय. मी नवीन होते मला वाटलं हे सगळं नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुमच्या भूमिकेकडे तुमचं लक्ष असतं. सगळ्यांसोबत असं होत नाही काहिंनी स्वत:ला चांगलं फिट ठेवलय पण काही वयोमानानुसार आणि अनुभवानुसार तसे वागायचे."

ईशा कोपिकर सारख्या अनेक अभिनेत्रींना करियरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलय. ईशाने केलेल्या खुलास्यानंतर पु्न्हा एकदा कास्टिंग काऊचचा मुद्दा चर्चेत आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: खरंच, सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करणे टाळले? Viral Video ने समोर आलं सत्य...

Khamgaon News : व्यापारी गाळ्यातून नगर परिषदची ३.४४ कोटींची बक्कळ कमाई; १२ गाळ्यांचा झाला लिलाव

Mumbai Fire: आगीपेक्षा धूर ठरला घातक! दहिसर आग दुर्घटना; इमारतीतील व्हेंटिलेशन आउटलेट बंद

Crime: आई-बाबा, मी थकलोय... युट्यूबवर व्हिडिओ बनवला, नंतर वडिलांसमोर पोरानं गळा चिरून घेतला, कारण वाचून डोळे पाणावतील

Electric Bike Fire : मुंबई-बंगळुर महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला आग; दुचाकीस्वार महिला थोडक्यात बचावली, महामार्गावर ३ किलोमीटर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT