Premier

शाहिद-अमृताच्या गाजलेल्या 'इष्क-विष्क'चा येतोय सिक्वेल ? पहिल्या लूक पोस्टरने वेधलं लक्ष

Ishq Vishk Rebound look poster released : रोहित सराफ आणि पश्मिना रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या इष्क विश्क रिबाऊंड सिनेमाचं लूक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

शाहिद कपूर, अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला इष्क-विष्क सिनेमा आठवतोय का? 2003 साली आलेल्या हा सिनेमा सुपरहिट झाला होता. शाहिद-अमृताची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती आणि आता या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतंच या सिनेमाचं पहिलं लूक पोस्टर सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आलं. 'इष्क विष्क रिबाउंड' असं या सिनेमाचं नाव आहे.

अभिनेता रोहित सराफ, अभिनेत्री पश्मिना रोशन, अभिनेता जिब्रान खान आणि अभिनेत्री नायला गरेवाल यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. "Re-directing you to the official season of #PyaarKaSecondRound ➡❤⬅#IshqVishkRebound" असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं असून चारही कलाकारांचा वेस्टर्न लूक या पोस्टरवर पाहायला मिळतोय. कलाकारांच्या लूकवरून पुन्हा एकदा कॉलेजमधील क्युट लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा अंदाज येतोय.

सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर होताच अनेकांनी कमेंट करत हा सिनेमा पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत अशा कमेंट्स केल्या. रोहित यात राघव ही भूमिका साकारणार आहे तर पश्मिना सान्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. जिब्रान साहिर ही भूमिका साकारत असून नायला रिया या भूमिकेत दिसणार आहे. 21 जुन 2024 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेला दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. निपुणने या आधी नेटफ्लिक्सवरील गाजलेली हिंदी वेबसिरीज मिसमॅच्डचं दिग्दर्शन केलं आहे. तर 2022 साली त्याचा 'मी वसंतराव' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचं खूप कौतुक झालं होत.

या सिनेमाची निर्मिती रमेश तौरानी यांनीच केली असून एक वेगळी लव्हस्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मिसमॅच्ड' या वेब सिरीजमुळे रोहित सराफला प्रसिद्धी मिळाली तसंच त्याच 'द स्काय इज पिंक ' या सिनेमातील कामही गाजलं. तर जिब्रानने 'कभी ख़ुशी कभी गम' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. शाहरुख आणि काजोलच्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती तर पश्मिना ही अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आणि सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आहे.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT