Janhvi Kapoor shared her bad experinece Esakal
Premier

Janhvi Kapoor : "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा 'तो' वाईट अनुभव

Janhvi Kapoor shared her bad experinece : अभिनेत्री जान्हवी कपूरने तिला आलेला वाईट अनुभव एका मुलाखतीत शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

'धडक' या सिनेमातून पदार्पण करत अभिनेत्री जान्हवी कपूरने स्वतःची एक ओळख बॉलिवूड सिनेविश्वात बनवली आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत जान्हवीने अनेकांचं मन जिंकलं आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी असलेल्या जान्हवीला तिच्या आयुष्यात फार स्ट्रगल करावा लागला नसला तरीही तिला लहान असताना फार वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं.

नुकतंच जान्हवीने चित्रपट निर्माता करण जोहरला मुलाखत दिली. धर्मा प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनेलवर ही मुलाखत शेअर करण्यात आली आहे. यावेळी तिने तिला ती 12-13 वर्षांची असताना आलेला वाईट अनुभव शेअर केला. एका अश्लील साईटवर तिचे फोटो व्हायरल करण्यात आले होते.

हा अनुभव सांगताना ती म्हणाली,"जेव्हा पहिल्यांदा मी मीडियाद्वारे लैगिंक हिंसा अनुभवली तेव्हा मी १२-१३ वर्षांची होते. मी आई आणि वडिलांबरोबर एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि त्यानंतर माझे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. तेव्हा इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाची क्रेझ नुकतीच वाढू लागली होती. आणि तेव्हा माझे फोटो पोर्नोग्राफिक साइटसारख्या एका वेबसाइटवर मला दिसले. त्या वेळेस शाळेतली मुलं माझ्याकडे बघून हसायची."

या घटनेबाबत सांगताना ती पुढे म्हणाली,"मला या घटनेतून बाहेर पडणं होतं. मी खूप पूर्वीपासून अशा नकारात्मक घटना बघतेय. तरीही मी यातून बाहेर पडले. एक प्रकारे तुमचं चरित्रहनन केलं जातं. जेव्हा ती एका विशिष्ट प्रकारे कपडे परिधान करते तेव्हा काही जण तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. कोणीही मला मी अशीच आहे किंवा तशीच आहे, असं समजू नये. लोकांनी मला गांभीर्यानं घेतलं पाहिजे "

सोशल मीडियावर जान्हवीची ही मुलाखत वेगाने व्हायरल होतेय. लवकरच जान्हवी आणि राजकुमार रावचा मिस्टर अँड मिसेस माही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 31 मे 2024 ला हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी जान्हवीने क्रिकेटचं ट्रेनिंग घेतलं आहे. सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा आहे.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT