jennifer lopez and ben affleck esakal
Premier

Isha Ambani: ना रणवीर-दीपिका ना रणबीर-आलिया; 'या' सेलिब्रिटी कपलने विकत घेतला ईशा अंबानीचा आलिशान बंगला

Isha Ambani: अंबानी कुटूंबाची लाडकी लेक ईशा आणि तिचा नवरा आनंद पिरामल यांनी त्यांचं लॉस एंजेलिसमधील आलिशान घर हॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध जोडप्याला विकलं.

priyanka kulkarni

Isha Ambani: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री वेडिंग सोहळ्यानंतर अंबानी कुटूंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते ईशा अंबानीमुळे. अंबानी कुटूंबाची लाडकी लेक ईशा आणि तिचा नवरा आनंद पिरामल यांनी त्यांचं लॉस एंजेलिसमधील आलिशान घर हॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध जोडप्याला विकलं. ही जोडी आहे हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि तिचा नवरा बेन अॅफेल्क (Ben Affleck)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद आणि ईशा यांनी जेनिफर आणि बेन यांना त्यांचं लॉस एंजेलिसमधील घर तब्बल ५०० करोड रुपयांना विकलं. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातच या घराविषयीचा करार ईशा आणि जेनिफर मध्ये झाला होता. लॉस एंजेलिसच्या बेव्हर्ली हिल्समध्ये असलेला हा आलिशान बंगला तब्बल ३८००० स्केअर फूटचा आहे. या बंगल्यात १२ बेडरूम्स, २४ बाथरूम्स, एक पिकलबॉल कोर्ट, जिम, सलोन, स्पा, १५५ फूट लांबीचा इनफिनिटी स्विमिंग पूल, एक आउटडोअर किचन आणि बंगल्याबाहेर सुंदरसे गार्डन यासोबतच मनोरंजनाचा अनेक सुविधांनी सज्ज आहे.

विशेष म्हणजे ईशा या आधी या बंगल्यात वास्तव्यास होती. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा बराच काळ या बंगल्यात ती राहिली होती. इतकंच नाही तर २०२३ साली हा बंगला तिने प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमाच्या स्क्रीनिंगसाठी दिला होता.

या बंगल्याची जेनिफर आणि बेन यांनी $६१ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल ५०० करोडहुन अधिक रुपये मोजल्याचं म्हंटल जातंय. त्यांचा हा करार गेल्या वर्षी जूनमध्ये झाला होता. जेनिफरची सध्याची संपत्ती ३ हजार ३३२ कोटींच्या घरात असल्याचं वृत्त आहे.

जेनिफरचं बेनसोबत चौथं लग्न असून ते बराच काळ डेट करत होते. ते २००० साली एकमेकांना डेट करत होते पण काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. २०२२ साली या जोडीने लग्नगाठ बांधली. जेनिफरला पुर्वश्रमीच्या पतीपासून दोन जुळी मुलं आहेत तर बेन सुद्धा तीन मुलांचा पिता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT