Justin Bieber And Hailey Bieber esakal
Premier

Justin Bieber: लग्नाच्या सहा वर्षानंतर हेली आणि जस्टिन बीबर होणार आई-बाबा; खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Justin Bieber And Hailey Bieber: जस्टिन आणि त्याची पत्नी हेली बीबर हे आई-बाबा होणार आहेत. जस्टिननं नुकतेच काही खास फोटो शेअर करुन चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Justin Bieber And Hailey Bieber: आपल्या गाण्यानं संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या जस्टिन बीबर (Justin Bieber) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जस्टिन आणि त्याची पत्नी हेली बीबर हे आई-बाबा होणार आहेत. जस्टिननं नुकतेच काही खास फोटो शेअर करुन चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे. जस्टिननं शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जस्टिननं शेअर केले फोटो

जस्टिननं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात हेली बीबर ही बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. जस्टिननं शेअर केलेल्या फोटोमध्ये हेली ही ऑल व्हाईट लूकमध्ये दिसत आहे तर जस्टिन हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे.जस्टिन आणि हेली यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला कमेंट करुन अनेकांनी जस्टिन आणि हेली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

जस्टिननं शेअर केलेल्या पोस्टला आतापर्यंत 11 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. गिगी हदीद, गॅल गॅडोट, किम कार्दशियन, काइली जेनर, क्रिस जेनर आणि डेमी लोवाटो या सेलिब्रिटींनी देखील जस्टिनच्या पोस्टला कमेंट करुन जस्टिन आणि हेली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेलीची सर्वात जवळची मैत्रीण, मॉडेल केंडल जेनर हिने हेलीच्या प्रेग्नन्सीबद्दल कळाल्यानंतर तिच्या काय भावना होत्या? याबद्दल सांगितले. ती म्हणाली, "मला अश्रू अनावर झाले"

2018 मध्ये हेली आणि जस्टिन यांनी न्यूयॉर्कमधील सिक्रेट वेडिंग केले. त्यानंतर एक वर्षांनी हेली आणि जस्टिन यांनी त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT