kakuda trailer  sakal
Premier

Kakuda Trailer: रागीट भुताला वेसण घालणार कोण? रितेश-सोनाक्षीच्या 'ककुदा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; फक्त ५ दिवस बाकी

Kakuda Movie On Ott: 'मुंज्या' नंतर आता 'ककुदा'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Payal Naik

Kakuda Movie Release Date: लोकप्रिय मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याच्या 'मुंज्या' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली. आता 'मुंज्या'नंतर आदित्यचा 'ककुदा' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ट्रेलरमधून ककुदाचा जबरदस्त अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.

चित्रपटातील कलाकारांनी हा ट्रेलर त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशमधील एका गावातील सगळे पुरुष मंगळवारी रात्री सव्वा सात वाजता घराचा छोटा दरवाजा उघडा ठेवतात. आणि जो पुरुष असं करत नाही त्याचा १३ व्या दिवशी मृत्यू होतो. या ककुदाला पकडण्यासाठी सोनाक्षी एका घोस्ट हंटरला बोलवते. तो भूत पकडणारा म्हणजे रितेश देशमुख. रितेश या भुताला पकडण्याचं खुलं आव्हान देतो. आता हे सगळे मिळून ककुदाला पकडू शकतात का, त्यांच्यातील कुणाचा खरंच मृत्यू होतो का, सोनाक्षीने ठरवलेली गोष्ट पूर्ण होते का असे अनेक प्रश्न हा ट्रेलर पाहून पडतात.

या ट्रेलरमुळे ककुदाला भेटायची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे हे मात्र नक्की. भीतीसोबत हास्याचे फव्वारे उडवणारा हा ट्रेलर तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाहीये तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी झी५ वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हं चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Congress : सतेज पाटलांसमोर कोल्हापूर महापालिकेत मोठं आव्हान; काँग्रेस इच्छुकांची लांबलचक यादी पण..., हिंदुत्व प्रचाराचा फॅक्टर

Lionel Messi India Tour: कोलकातात जे घडलं, त्यामागे मेस्सीच खरा दोषी; गावस्करांनी साधला निशाणा, आयोजकांची पाठराखण

Tata Group UP: टाटा समूहाने UP साठी उघडला खजिना; लखनौला बनवणार 'एआय सिटी', TCS मध्ये करणार मेगा भरती

Open Golf: नवी मुंबईत एक कोटी रुपये बक्षिसांची गोल्फ स्पर्धा; राष्ट्रीय अन्‌ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग; १८ होल मैदानावर चुरस

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

SCROLL FOR NEXT