Indian  sakal
Premier

VIDEO: कमल हासन यांचा 'इंडियन' पुन्हा झाला रिलीज; प्रेक्षकांनी थिएटरमध्येच केली फटाक्यांची आतषबाजी, व्हिडीओ व्हायरल

Kamal Haasan: 'इंडियन 2' हा चित्रपट रिलीज होण्याआधी कमल हासन यांचा इंडियन हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला आहे.

priyanka kulkarni

Indian: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच त्यांचा 'इंडियन 2' (Indian 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन 2' हा चित्रपट रिलीज होण्याआधी कमल हासन यांचा इंडियन हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा शो चेन्नईच्या कमला सिनेमामध्ये झाला. या शोदरम्यान प्रेक्षकांनी थिएटरमध्ये फटाके फोडले.

थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' या चित्रपटात कमल हासन यांच्या व्यतिरिक्त मनीषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर यांनी प्रमुख भूमिका साकारली. 'इंडियन' या चित्रपटाच्या रि-रिलीजच्या शोदरम्यान कमल हासनच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. थिएटरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या शोदरम्यान चाहत्यांनी कस्टम-मेड टी-शर्ट घातले होते, ज्यावर "इंडियन इज बॅक" असं लिहिलेलं दिसले.

पाहा व्हिडीओ:

कधी रिलीज होणार 'इंडियन-2'?

1996 मध्ये 'इंडियन' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात कमल हासन यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. आता 'इंडियन 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले आहे. 'इंडियन 2' हा चित्रपट 12 जुलैला रिलीज होणार आहे.

'इंडियन 2' चित्रपटाची स्टार कास्ट

'इंडियन-2' या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि प्रिया भावनानी शंकर यांच्याही भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचा तिसरा भाग 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT