Antarpat Esakal
Premier

Antarpaat : 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदाभजी पार्टी! गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी

Marathi Actors On Set Fun : कलर्स मराठीवरील अंतरपाट मालिकेतील कलाकारांनी सेटवर भजी पार्टी केली. सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा होतेय.

सकाळ डिजिटल टीम

मालिकेत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्स बरोबरच चर्चा रंगते ती कलाकारांच्या ऑफ स्क्रीन मस्तीची. पावसाळा सुरु झालाय आणि घरोघरी चमचमीत पदार्थांची मेजवानी सुरु झालीये. या सगळ्यात कलाकार तरी कसे मागे राहतील. कलर्स मराठीवरील अंतरपाट या मालिकेच्या सेटवरही 'कांदा भजीची' पार्टी करण्यात आली. मालिकेतील गौतमी-क्षितिज अर्थात रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनीच किचन हाती घेतलं आणि आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली. त्यामुळे साहजिकच कांदाभजी खात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमने पावसाचा आनंद लुटला.

'अंतरपाट' मालिकेच्या सेटवर कांदा भजी बनवल्याबद्दल रश्मी अनपट म्हणाली,"पाऊस आणि कांदाभजी हे माझं ठरलेलं समीकरण आहे. पुण्यात असताना पावसाळ्यात सिंहगडावर मी खास कांदाभजी खायला जायचे. पण यंदा शूटमुळे सिंहगडावर जाऊन कांदाभजी खाणं शक्य नाही. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रात्री घरी जाऊन कांदाभजी बनवणंदेखील शक्य होत नाही. त्यामुळे मी माझं दुसरं कुटुंब अर्थात 'अंतरपाट' मालिकेच्या टीमसोबत शूटिंगदरम्यानच कांदाभजीचा आस्वाद घेण्याचं ठरवलं".

रश्मी पुढे म्हणाली,"मी आणि अशोकने कांदाभजी बनवण्याचं ठरवल्यानंतर स्पॉट दादांनी आम्हाला त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणून दिली. मग मी आणि क्षितिजने आमच्या संपूर्ण युनिटसाठी मस्त गरमा गरम कांदाभजी बनवली. सगळ्यांनी एकत्र बसून कांदाभजीचा आस्वाद घेतला. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही दोघांनी बनवलेली कांदा भजी संपूर्ण युनिटला आवडली. खरंतर आम्ही मजा, मस्ती करत कांदाभजी बनवली आणि त्यावर ताव मारला. 'अंतरपाट' मालिकेच्या सेटवरची ही पावसाळी मेजवानी मी कधीही विसरू शकत नाही".

मालिकेत आता आगामी भागात गौतमी आणि जान्हवी एकमेकींच्या समोर येणार आहेत. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग इंटरेस्टिंग असतील. त्यामुळे पाहा 'अंतरपाट', दररोज संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि JioCinema वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT