Kangana Ranaut Election Campaign Esakal
Premier

Kangana Ranaut: मेरे देश ने मुझे अपनाया है... होळीच्या मुहूर्तावर कंगणाने उडवला प्रचाराचा बार

Mandi Lok Sabha: यापूर्वी कंगना म्हणाली होती की, "मी चित्रपटांच्या सेटवरुन अनेक राजकाण्यांशी लढली आहे. त्यामुळे आता मी राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली आहे."

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला नुकतेच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशातील मंडीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कंगना सध्या आपल्या मूळ गावी आहे.

दरम्यान देशभरातील अनेक भागांत आज होळी (रंगपंचमी) साजरी केली जात आहे. हाच मुहूर्त साधत कंगणाने होळी खेळत आपल्या प्रचाराचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्रीने याबाबतची पोस्ट शेअर करून माहिती दिली. (Kangana Ranaut Starts Election Campaign On Occasion of Holi)

कंगना रणौतने तिच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये, कंगणाने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यामध्ये ती तिच्या चेहऱ्यावर रंग आणि हिमाचली टोपी घातलेली दिसत आहे.

तर दुसऱ्या छायाचित्रात कंगना काही महिलांसोबत गुलाल उधळून त्यांच्यासोबत होळी साजरी करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना कंगना राणौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेरे गाँव की मिट्टीने मुझे बुलाया हैं, मेरे देश ने मुझे अपनाया हैं.'

Kangana Ranaut Starts Election Campaign On Occasion of Holi

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कंगनाला हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

दरम्यान कंगनानेही रविवारी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली होती.

आपल्या स्टोरीमध्ये कंगना म्हणाली होती की, "माझ्या प्रिय भारताने आणि भारतातील जनतेने माझ्या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मभूमी, हिमाचल प्रदेश, मंडी येथून लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सतत वादाच राहणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वीच राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यावेळी कंगना म्हणाली होती की, "मी चित्रपटांच्या सेटवरुन अनेक राजकाण्यांशी लढली आहे. त्यामुळे आता मी राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT