kartiki gaikwad esakal
Premier

Kartiki Gaikwad: कुणीतरी येणार येणार गं! कार्तिकी गायकवाड होणार आई, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

Kartiki Gaikwad: कार्तिकीचं डोहाळे जेवण नुकतेच पार पडलं आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

priyanka kulkarni

Kartiki Gaikwad: सा रे ग म प फेम लिटिल चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) ही लवकरच आई होणार आहे. कार्तिकीचं डोहाळे जेवण नुकतेच पार पडलं आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिकी खास लूकमध्ये दिसत आहे.

कार्तिकीनं शेअर केले फोटो

कार्तिकीनं तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकी ही हिरव्या रंगाची साडी, पांढऱ्या रंगाच्या फुलांचे दागिने आणि नाकात नथ अशा लूकध्ये दिसत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. अनेकांनी फोटोला कमेंट करुन कार्तिकी आणि रोनित पिसे यांना शुभेच्छा दिल्या.

कार्तिकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात "मी आई होणार" आणि रोनितच्या हातात "मी बाबा होणार" असं लिहिलेले कार्ड्स दिसत आहेत.

2020 मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. आता कार्तिकी आणि रोनित हे लवकरच आई-वडील होणार आहेत.

कार्तिकी गायकवाड ठरली 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स कार्यक्रमाची विजेती

'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनची कार्तिकी गायकवाड ही विजेती ठरली होती. या कार्यक्रमात कार्तिकीनं गायलेल्या 'घागर घेऊन' या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

कार्तिकी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कार्तिकी तिच्या गाण्यांची माहिती तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत देत असते. तिला इन्स्टाग्रामवर 117k फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT