Premier

Ketaki Chitale : "आश्रम उघडला आहे का आपण ?", शेख हसीना यांना आश्रय देण्यावरून केतकी चितळेचा संताप, म्हणाली - पाकिस्तान...

Ketaki Chitale on Bangladesh Crisis : अभिनेत्री केतकी चितळेने बांगलादेशी नागरिक आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय देण्यावरून तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असते. लव्ह जिहाद, यशश्री शिंदे, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर या आधीही केतकीने तिची सडेतोड मतं व्यक्त केली आहेत. सध्या बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे त्या देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. याबाबत केतकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.

बांगलादेशी नागरिक आणि तेथील पंतप्रधानांना भारतात मिळणारा आश्रय यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना केतकी म्हणाली कि,"१. लंडनने आश्रय देण्यास नकार दिला, शेख हसीना इथेच येतात.

२.म्यानमार मधील रोहिंग्यांना ५२ मुस्लिम देश दिसत नाहीत, मेले इथेच येतात कडमडायला.

३. बांग्लादेशींना पाकिस्तान इतका जवळचा वाटतो तिथे जात नाहीत. आठवडा बाजारात चायला रजई १०० रुपये टाकाने विकणार इथेच

जवळपास आपण धर्मशाळा, ओह सॉरी धर्म नाही कारण धर्म म्हंटले कि, हे सो-कॉल्ड भारतीय 'सो कॉल्ड अल्पसंख्याक मुसलमान' समाज जो बिचारा भीतीच्या छत्रछायेखाली असतो नाही का; त्यामुळे धर्म नाही. आश्रम उघडला आहे का आपण ? या आणि मारा आमची" अशी पोस्ट तिने इंस्टग्राम स्टोरीमध्ये शेअर करत शेख हसीना यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्रयाबाबत नाराजी व्यक्त केली.

या आधीही तिने निवडणुकीत भाजपाला बहुमत न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत सगळ्या हिंदू समाजाचा निषेध केला होता. अनेकांनी तिच्यावर याबाबत टीका केली होती तर काहींनी तिचं समर्थन केलं होतं. तिच्या या पोस्टवरही संमिश्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

यशश्री शिंदे प्रकरणावरही केतकीने तिची नाराजी व्यक्त केली होती सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने "लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे. लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे. जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.'" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT