Kushal Badrike esakal
Premier

Kushal Badrike: "मागे एका भांडणात ही म्हणाली होती..."; बायकोबाबत कुशलची मजेशीर पोस्ट

Kushal Badrike: नुकतीच कुशलनं एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Kushal Badrike: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा सोशल मीडियावर विविध रिल्स आणि फोटो शेअर करतो. त्याच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकतीच कुशलनं एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कुशलनं शेअर केली मजेशीर पोस्ट

कुशलनं त्याच्या बायकोसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये कुशलची बायको सुनैना बद्रीके ही कुशलच्या पुढे चालताना दिसत आहे. तर कुशल हा सुनैनाच्या मागे हातात बऱ्याच बॅग्स घेऊन चालताना दिसत आहे. कुशलनं सुनैनासोबतच्या या फोटोला हटके कॅप्शन दिलं आहे.

कुशलनं सुनैनासोबतच्या फोटोला कॅप्शन दिलं, "मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून." कुशलच्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. कुशलनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

एका नेटकऱ्यानं कुशलच्या फोटोला कमेंट केली, "वहिनी रॉक, दादा शॉक" तर दुसऱ्या युजरनं कमेंट केली, "वहिनी त्यांच्या जागी बरोबर आहेत"

कुशलला चला हवा येऊ द्या या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानं जत्रा,बकुळा नामदेव घोटाळे आणि पांडू या चित्रपटामध्ये कुशलनं काम केलं आहे. सध्या तो मॅडनेस मचाएंगे या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कुशलच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT