Aliya Bhat: sakal
Premier

Aliya Bhat: मुलांना त्यांच्या वाटा निवडू द्या, आलिया भटने दिला पालकांना सल्ला

Ranbir Kapoor Aliya Bhat Daughter: सुपरस्टार आई-वडिलांची लेक असणारी राहा म्हणजे रणबीर-आलियाच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय असतो.

सकाळ वृत्तसेवा

Raha Kapoor: अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर अजून दोन वर्षांचीही नसली तरी तिची भरपूर चर्चा सोशल मीडियावर होत असते. बॉलीवूडमधल्या दोन बड्या कुटुंबांची नात आणि सुपरस्टार आई-वडिलांची लेक असणारी राहा म्हणजे रणबीर-आलियाच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय असतो.

या गोष्टी जशा तिच्यासाठी आता अतिशय सकारात्मक आहेत, तशाच मोठेपणी त्या तिच्यावर दडपणही निर्माण करू शकतात. कारण प्रत्येक वेळी तिच्या बारीकशा कृतीकडेही त्याच नजरेतून पाहिलं जाणार. याचं दडपण कधी राहावर येऊ शकतं का, असा प्रश्न विचारला असता राहाची आई म्हणून आलियाने दिलेलं उत्तर खूप खास आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत जेव्हा आलियाला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा आलिया म्हणाली की, राहाने असंच असावं, तसंच असावं अशी माझी कोणतीही अपेक्षा नाही.

मला असं वाटतं की, तिने इतर कोणत्याही गोष्टींचं दडपण घेऊन कधीही काही करू नये, ज्यामुळे ती स्वत:च कधी आनंदी नसेल. कोणाची मुलगी, कोणाची नात होण्यापेक्षा तिने तिचंच स्वत:चं बेस्ट व्हर्जन व्हावं, ज्यात तिचा खरा आनंद आहे.

आलिया पुढे म्हणते की माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, प्रत्येक मूल त्याची स्वत:ची काही कौशल्ये घेऊन जन्माला येत असतं. आपल्याला एक पालक म्हणून मुलांच्या त्या गुणांना विकसित करण्यासाठी फक्त वाव द्यायचा असतो, प्रोत्साहन द्यायचं असतं. त्यामुळे मुलांना त्यांच्या वाटा त्यांच्या मनाने निवडू द्याव्यात. राहाच्या बाबतीतही माझा हाच विचार नेहमी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT