Premier

Madhuri Dixit : माधुरी-श्रीराम यांचा रोमँटिक डान्स ; पतीच्या सरप्राईजने माधुरी भारावली

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांनी तिला खास सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिचा चार्म टिकवून आहे. सोशल मीडियावरील तिच्या अॅक्टिव्हिटीज कायमच चर्चेत असतात. सध्या ती डान्स दिवाने या रिअलिटी शोचं परीक्षण करतेय आणि यातील माधुरीच्या एका प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी नुकतीच डान्स दिवानेमध्ये हजेरी लावत माधुरीला सरप्राईज दिलं. यावेळी त्या दोघांनी तुमसे मिलके या परिंदा सिनेमातील गाण्यावर डान्स केला. सोशल मिडीयावर त्यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी सोशल मिडीयावर कमेंट्स करत या जोडीच्या डान्सचं कौतुक केलं.

पहा व्हिडीओ :

स्पर्धकांचे डान्स सुरु असतानाच शोची होस्ट भारती सिंहने अचानक माधुरीच्या पतींच्या श्रीराम नेनेंच्या नावाची घोषणा केली आणि यामुळे माधुरीला सुखद धक्का बसला. ब्राऊन शर्ट आणि लाईट ग्रे सूटमध्ये श्रीराम हँडसम दिसत होते. त्यांच्यासोबत माधुरीचा पेट डॉग कार्मेलोने सुद्धा सेटवर हजेरी लावली. सेटवर कार्मेलोची सुरु असलेली मस्ती सगळ्यांनी एन्जॉय केली. तर माधुरी आणि श्रीराम यांच्या रोमँटिक डान्सवर सगळेचजण फिदा झाले.

याआधीही श्रीराम यांनी माधुरीला अचानक सेटवर येत सरप्राईज दिलं आहे. २०१३ साली झलक दिखला जा या रिऍलिटी डान्स शोच्या सेटवर श्रीराम आले होते आणि त्यांनी गुडघ्यावर बसून माधुरीला प्रपोजही केलं होतं. त्यावेळी माधुरीसोबत निर्माता करण जोहर आणि कोरियोग्राफर रेमो डिसोझासुद्धा उपस्थित होते.

सर्जन ते निर्माता

माधुरीचे पती श्रीराम नेने यांचा जन्म परदेशात झाला असून ते अमेरिकेमध्ये बराच काळ सर्जन म्हणून काम करत होते. लग्नानंतर माधुरीसुद्धा काही काळासाठी अमेरिकेला स्थायिक झाली. पुढे मुलांवर भारतीय संस्कार व्हावेत आणि बॉलिवूडमधील करिअरसाठी माधुरीने कायमचं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. श्रीराम यांनीही तिच्या निर्णयात तिची साथ दिली. सर्जन म्हणून त्यांनी काही काळ भारतात काम केलं यासोबतच ते आता सिनेमांची निर्मितीही करत आहे. त्यांनी आतापर्यंत बकेट लिस्ट, पंचक आणि १५ ऑगस्ट या सिनेमाची निर्मिती केली आहे.

पंचक हा सिनेमा २०२४ मध्ये रिलीज झाला. या सिनेमात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका होती. घरातील माणसाच्या मृत्यूनंतर पंचक लागल्याचं भटजी घरच्यांना सांगतात आणि पुढे काय गंमत घडते याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Subhash Deshmukh: सत्तेची फळे चाखण्यासाठीच भाजपमध्ये इनकमिंग: आमदार सुभाष देशमुख; विरोधकांना पराभव दिसू लागला

Latest Marathi Live Update News: गेवराई नगर परिषदेवर पुन्हा पवारांचा झेंडा फडकणार की पंडित बाजी मारणार

PMRDA News : प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतरच विकास परवानगी; अवैध बांधकामे रोखण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा निर्णय, ‘पेपर मंजुरी’ला पूर्णविराम

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT