namrata sambherao and prasad khandekar esakal
Premier

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

Prasad Khandekar: अभिनेत्री नम्रता संभेरावनं देखील खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं प्रसादसोबतचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Namrata Sambherao and Prasad Khandekar: छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या कार्यक्रमामधील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. अभिनेता प्रसाद खांडेकर हा देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. प्रसादचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री नम्रता संभेरावनं देखील खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं प्रसादसोबतचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नम्रतानं शेअर केला फोटो

नम्रतानं 2013 मधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.तसेच नम्रतानं यावर्षीचा देखील फोटो शेअर केला आहे. नम्रतानं या फोटोला कॅप्शन दिलं, "Cheers 10years of friendship, हॅप्पी बर्थ-डे पश्या, तू खूप टॅलेंडेट आहेस,खूप प्रेम पश्या, खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ, तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सची लाइन लागू दे ,सिनेमे नाटक सगळंच खूप गाजू दे ,त्या सगळ्यात मी नेहमीच असेन, कारण माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाची सुरुवात तू लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कुर्रर्रर्र ह्या नाटका पासून झाली आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला, थँक्यू सो मच आज हास्यदिन आहे किती सुंदर योगायोग "

नम्रतानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलं.नम्रता आणि प्रसाद हे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.

प्रसादनं दिग्दर्शित केलेल्या एकदा येऊन तर बघा या चित्रपटात नम्रतानं काम केलं. तसेच त्या दोघांनी कुर्रर्रर्र या नाटकात देखील एकत्र काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी नम्रताचा नाच गं घुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT