Premier

Namrata Sambherao : हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने बांधलं नवं घर ; फोटो शेअर करताना म्हणाली "विश्वास हा सगळ्या गोष्टी..."

Namarata Sambherao New Home : अभिनेत्री नम्रता संभेरावने नवीन घर बांधून त्यात गृहप्रवेश केला. पाहूया तिच्या नव्या घराची खास झलक.

सकाळ डिजिटल टीम

Namrata Sambherao Post : कधी लॉली तर कधी बावली अवली कोहली अशा भन्नाट व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर सुद्धा खूप चर्चेत असते. तर 'नाच गं घुमा' सिनेमातील तिच्या अभिनयाचं सुद्धा खूप कौतुक झालं. नम्रताने नुकतंच नवीन घर बांधलं असून सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

नम्रताची पोस्ट

नम्रताने सोशल मीडियावर तिच्या नव्या घराचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली. नम्रताने तिच्या सासरच्या गावी नवीन शेतघर बांधलं असून या घराचा गृहप्रवेश सोहळा थाटात पार पडला. सोशल मीडियावर नम्रताने गृह्प्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत आणि त्याला "🌺गणपती बाप्पा मोरया🌺 आमचं शेतीघर 🏡
विश्वास सगळ्या गोष्टी शक्य करतो आणि प्रेम सगळ्या गोष्टी सोप्या करतं" असं कॅप्शन दिलं आहे. नम्रताने या कार्यक्रमासाठी मोरपिशी आणि अबोली रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली होती तर तिचा नवरा आणि मुलगाने तसेच अबोली रंगाचे कुर्ते यावेळी घातले होते. घरात पूजा आणि नंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्याचं या फोटोमध्ये दिसून आलं.

नम्रताने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिचे सेलिब्रिटी मित्र आणि चाहते यांनी तिचं नवीन घर बांधल्याबद्दल अभिनंदन केलं आणि अशीच प्रगती करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. नम्रताचा बेस्ट फ्रेंड आणि अभिनेता प्रसाद खांडेकरनेही कमेंट करत तिचं अभिनंदन केलं. "खुप खुप खुप अभिनंदन संभेराव's फॅमिली.. नमा योगेश आणि मालक रुद्राज" अशा शब्दांमध्ये त्याने नम्रताचं अभिनंदन केलं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून नम्रता प्रेक्षकांच्या भेटीस येतच आहे याबरोबरच तिचा नाच ग घुमा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमात तिने मुक्ता बर्वेबरोबर काम केलं होतं. तर आता ती एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन! कोण आहेत नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत? सीपी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT