Mumbai Police reply to actress Malavika’s viral safety post  esakal
Premier

'एक चुम्मा देगी क्या' मुंबई लोकलमध्ये अभिनेत्रीसोबत वाईट कृत्य, मालविकाच्या पोस्टला मुंबई पोलिसांचं उत्तर, म्हणाले...

Actress Malavika Mohanan local train harassment experience in Mumbai: अभिनेत्री मालविका मोहनन हिचं मुंबई लोकलमध्ये घडलेलं तिच्यासोबतच वाईट प्रसंग तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी तिच्या पोस्टला उत्तर देत वेळीच मुंबई पोलिसांनी कळवण्याची विनंती केली आहे.

Apurva Kulkarni

सिनेसृष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मुंबई. सिनेसृष्टीतील सगळे प्रोडक्शन हाऊस हे मुंबईतच आहे. त्यामुळे सगळ्या कलाकरांचं वास्तव्य हे मुंबईतच असतं. दरम्यान मुंबई सुरक्षित आहे की यावर नेहमी वाद सुरु असतो. दरम्यान अशातच आता 'द राजा साहब' चित्रपटातील अभिनेत्री याबाबत सविस्तर बोलली आहे. तिने तिच्यासोबत झालेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे.

मालविका म्हणाली की, 'लोक नेहमी म्हणतात की, महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. परंतु मी यावर बोलणार आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा माझा रोजचा प्रवास हा मुंबई लोकल ट्रेन आणि बसने असायचा. तेव्हा मी पुर्णपणे स्वत:ला सुरक्षित समजत नव्हते. परंतु मला रोज आशा असायची की आजचा दिवस तरी चांगला जाईल.'

पुढे बोलताना मालविका म्हणाली की, 'मी एकदा माझ्या दोन मैत्रिणीसोबत मुंबई लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी रात्रीचे 9:30 झाले असतील. मी फर्स्ट क्लासच्या महिला डब्यात खिडकीजवळ बसले होते. तेव्हा अचानक एक व्यक्ती माझ्या खिडकीजवळ आला आणि मला म्हणाला, 'एक चुम्मा देगी क्या?' मी तेव्हा हैराण झाले. तेव्हा मला फार असुरक्षित वाटलं.'

दरम्यान मालविका हिच्या लोकल ट्रेनमधील धक्कादायक अनुभवावर मुंबई पोलिसांनी तिच्या पोस्टवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी तिला धीर देत पुढील वेळेस तातडीने 112 किंवा 100 वर संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच गुन्हेगारी न सांगणं हे गुन्हेगाराला समर्थन केल्यासारखं असल्याचंही ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT