Mayuri Deshmukh sakal
Premier

Man Dhaga Dhaga Jodte Nava: मन धागा धागा जोडते नवा मालिकेत मोठा ट्वीस्ट; होणार 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

Mayuri Deshmukh: मन धागा धागा जोडते नवा (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेतील सुखदा ही व्यक्तिरेखा कोणती अभिनेत्री साकारणार आहे? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

priyanka kulkarni

Man Dhaga Dhaga Jodte Nava: छोट्या पडद्यावरील मन धागा धागा जोडते नवा (Man Dhaga Dhaga Jodte Nava) मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखची (Mayuri Deshmukh) एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे. मयुरी देशमुख एक उत्तम अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे.

भूमिकेबद्दल काय म्हणाली मयुरी?

स्टार प्रवाहसोबतची मयुरीची ही पहिलीच मालिका आहे. सुखदा या व्यक्तिरेखविषयी सांगताना मयुरी म्हणाली, "मी जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे."

"आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखिल पूर्ण होतेय. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेलच.", असंही मयुरीनं सांगितलं आहे.

'मन धागा धागा जोडते नवा'ची स्टार कास्ट

अभिषेक रहाळकर, दिव्या पुगावकर, अश्विनी मुकादम हे कलाकारमन धागा धागा जोडते नवा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT