manasi naik  esakal
Premier

सगळं खोटं होतं, माझा वापर केला... लग्नात अशी झालेली मानसी नाईकची फसवणूक, अभिनेत्री म्हणालेली-

Manasi Naik Birthday: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं.

Payal Naik

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिने 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यातून घराघरात ओळख मिळवली. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्येही दिसली. मात्र लग्नाच्या बाबतीत अभिनेत्रीची सगळी स्वप्न अपूर्णच राहिली. तिने हरयाणवी बॉक्सर प्रदीप खरेरा याच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र थाटामाटात लग्न केल्यानंतर तिच्या पदरी निराशाच पडली. मानसीने एका मुलाखतीत तिची नेमकी कशी फसवणूक करण्यात आली हे सांगितलं होतं.

आज २ फेब्रुवारी रोजी मानसीचा वाढदिवस. मानसीने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांशी जोडलेली असते. तिने लग्नाच्या वर्षभरातच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र ही वेळ का आली हे तिने एका मुलाखतीत सांगितलेलं. या मुलाखतीत बोलताना मानसी म्हणालेली, 'मला नेहमीच वाटायचं की लग्न करावं, आपली फॅमिली असावी, असेल, तो स्वप्नांचा फुगा आता फुटलाय. आणि आता काही दिवसांत अधिकृतपणे फुटेल.'

माझा फक्त वापर झाला

ती पुढे म्हणाली, 'खरं कर रिल्स पुरताच हा प्रवास होता. मीडिया, पब्लिसिटीससाठीच ते सगळं होतं. मला जे सांगण्यात आलं ते काहीच खरं नव्हतं. सगळीच फसवेगिरी होती. ही फसवेगिरी पकडण्यात आली. त्यामुळं आता या गोष्टी कोर्टात गेल्या आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रीयन व्ह्युअर्स मिळवण्यासाठी माझा फक्त वापर झाला.'

माझी फसवणूक झाली

मानसी पुढे म्हणाली, 'आईनं ममता दाखवणं वेगळं आणि जेव्हा तुम्ही नवऱ्याची आई म्हणून काळजी दाखवता, प्रेम करता, तेव्हा तिथं चुकतं. मी एक आई म्हणून, वडील म्हणून, भाऊ म्हणून , मोठी म्हणून अगदी पॉकेट मनी देण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या.तसंच सगळ्यांना वाटतं की मी पैशासाठी लग्न केलं, पण खरं तर ते उलटं होतं. माझी फसवणूक झाली.'

काही महिन्यांपूर्वीच मानसीने स्वतःचं घर घेतलंय. ता ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये देखील आहे. तिने त्या व्यक्तीसोबतचं रिलेशनशिप अधिकृत केलेलं नसलं तरी आपण लवकरच लग्न करणार आहोत अशी हिंट तिने चाहत्यांना नक्की दिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT