dharmaveer 2 sakal
Premier

Dharmaveer 2: विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 'धर्मवीर २'ची घोषणा केली का? मंगेश देसाईंनी स्पष्टच सांगितलं- यापूर्वी...

Dharmaveer 2 Release Date: आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून 'धर्मवीर २' ची घोषणा करण्यात आली का या प्रश्नावर मंगेश देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक याच्या 'धर्मवीर' चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग हा १२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येतोय का असा प्रश्न विचारण्यात येतोय. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी आता या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन नाट्य पाहायला मिळालं. या चित्रपटाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवडणुकीतील यशात या चित्रपटाचा वाटा असल्याचं बोललं गेलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट आता प्रदर्शित करण्यात येतोय का असं विचारण्यात येतोय. आता प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत मंगेश देसाई म्हणाले, 'असं पहिल्या भागावेळी देखील असंच बोललं गेलं. असं सगळं घडणार होतं, म्हणून 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1' आणण्यात आला होता. पण असं काहीच नाहीये.'

मंगेश म्हणाले, 'पहिला भागही मागच्या वेळी 22 एप्रिल रोजी आणण्यात आला होता. काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून तो पुढे ढकलला. माझ्या लोकांनी सांगितलेल्या किस्स्यांचं 72 तासांचं रेकॉर्डिंग आहे. आता त्या एका सिनेमात कसं दाखवायचं. म्हणून तेव्हाच आमचं दुसरा भाग काढायचं हे ठरलं. त्यासाठी माझी आणि प्रवीणची चर्चा देखील झाली की दुसरा भाग करावाच लागेल. पहिल्या भागाचं 4.30 तासांचं शुटींग झालं होतं. त्यातलं तीन तासाचं तुम्ही पाहिलंत उरलेल्या दीड तासाचं करणार काय? त्या दीड तासांमध्ये बरचे चांगले किस्से आहेत जे प्रेक्षकांसमोर यायलाच हवे.

पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्याचवेळी आमचं ठरलं की, भाग दोनही शूट करायचा. एका पुरस्कार सोहळ्यावेळी प्रवीण मला म्हणाला की मंगेश दुसऱ्या भागाची रुपरेषा तयार झाली आहे आणि पहिल्या भागातल्या बऱ्याच गोष्टी आपण वापरु शकतो. त्यावेळी मी प्रवीणला म्हटलं की, ती तुला जर ते योग्य वाटत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठीच आपण पार्ट 2 करतोय, तर मला ह्यात अजिबात रस नाही. ते सीन योग्यरित्या बसत असतील आणि तुझं स्क्रिप्ट असेल तरच ते आपण करुया. त्यामुळे दुसऱ्या भागाची तयारी तेव्हाच सुरु झाली होती.' मंगेश यांच्या या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT