Abhijeet Kelkar & Vinesh Phogat Esakal
Premier

Vinesh Phogat : "तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही" ; असं म्हणत मराठी अभिनेत्याचा विनेश फोगटला साक्षात दंडवत

Marathi actor post for Vinesh Phogat : विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात जपानच्या स्पर्धकाला हरवत फायनलमध्ये धडक घेतली. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत तिची माफी मागितली.

सकाळ डिजिटल टीम

Abhijeet Kelkar : विनेश फोगटला कुस्तीची फायनल खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. अंतिम सामन्यापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासणीत विनेशचे वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम अधिक आढळले आहे त्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर रौप्य पदकही तिला मिळणार नसल्यामुळे भारताचं ऑलिम्पिकमधील एका पदकाचं स्वप्नं अधुरं राहील आहे. यातच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत असून त्याने विनेशची माफी मागितली.

अभिजीतची पोस्ट

सोशल मीडियावर अभिजीतने विनेशसाठी पोस्ट शेअर करत म्हंटलं कि,"आम्ही चुकलो...मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो, तुझ्यातल्या स्त्रीत्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले... पण तू हरली नाहीस. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही... तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत" अभिजीतची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

गेल्या वर्षी विनेशने भारताच्या कुस्तीपटूंनी कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. तिने आणि साक्षी मलिकने या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि तिच्यावर लाठीचार्ज सुद्धा झाला होता पण आता तिने इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला.

विनेशने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून थेट अंतिम फेरीत मजल मारली होती. विनेश ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणार हे जवळपास निश्चित झालं होतं. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता पण या छोट्याशा धक्क्याने सगळ्यांचीच निराशा केली.

अभिजीतबरोबरच तेजस्विनी पंडित, चेतन वढनेरे, पल्लवी पाटील, सोहा अली खान या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशच अभिनंदन केलं होतं पण अंतिम फेरीसाठी विनेश अपात्र ठरल्याने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे तर विनेशच्या कुटूंबाने ऑलिम्पिक समिती आणि सरकारच षडयंत्र असल्याचं म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT