Prasad Oak Esakal
Premier

Prasad Oak: मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त मानधन स्वीकारणारा अभिनेता ? प्रसाद ओक म्हणाला...

Prasad Oak Comment on being highest paid actor in industry : मराठी इंडस्ट्रीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता प्रसाद ओकने त्याला मिळणाऱ्या मानधनावर भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

Prasad Oak Interview: मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओम सध्या करत असलेल्या विविध प्रोजेक्ट्स मुळे खूप चर्चेत आहे. लवकरच रिलीज होणारा धर्मवीर २ असो किंवा महापरिनिर्वाण हा बहुप्रतीक्षित सिनेमा. प्रत्येक सिनेमातून त्याने आजवर वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या मानधनावर भाष्य केलं.

आरपार या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसादला तो सध्या इंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त मानधन आकारणार अभिनेता आहे आणि त्यावर तुझं काय मत आहे असा प्रश्न विचारला. त्यावर प्रसादने उत्तर दिल कि,"मी इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे कि नाही हा प्रश्न दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक म्हणजे माझी पत्नी मंजिरी आणि दुसरी व्यक्ती मंगेश देसाई. मंजिरी सगळे माझे व्यवहार सांभाळते आणि मंगेश 'धर्मवीर २' सिनेमाचा निर्माता आहे. पण या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल कि, मी सगळ्यात जास्त मानधन आकारतो का ? या पेक्षा सगळ्यात जास्त माझे सिनेमे पहिले जातात का ? किंवा लोक माझ्याविषयी सगळ्यात जास्त वाचतात का ? मी जास्तीत जास्त वेड लावणार अभिनेता आहे का? हे जाणून घेण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. "

पुढे त्याला श्रीमंत अभिनेता म्हणून ब्लॅक कॉफी किंवा घरी पेट असणं हे स्टेट्स सिम्बॉल असतात का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला कि,"मुळात जेव्हा भूक भागवायला लागतात तेवढे पैसे नव्हते तेव्हा भूक मारायला मी ब्लॅक कॉफी प्यायला लागलो. कॉफीने भूक मरते. त्यामुळे हे श्रीमंतीचं लक्षण समजतात हे मला माहित नव्हतं पण त्यावेळी भूक मारण्यासाठी मी प्यायला लागलो आणि नंतर मला त्याची सवय झाली. "

प्रसादचा लवकरच धर्मवीर २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात तो पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT