Mrunal Dusanis New Serial Esakal
Premier

Mrunal Dusanis : मृणालचा मालिकाविश्वात कमबॅक ; सेटवरील फोटो व्हायरल

Mrunal Dusanis Viral Photo : अभिनेत्री मृणाल दुसानिस लवकरच मालिकाविश्वात कमबॅक करतेय. सोशल मीडियावर तिचा सेटवरील फोटो व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mrunal New Serial : मराठी मालिकाविश्वातील सगळ्यांची लाडकी मृणाल दुसानिस बऱ्याच काळाने भारतात परतली. हे मन बावरे या मालिकेनंतर मृणाल अमेरिकेला शिफ्ट झाली होती. आता ती नवरा आणि मुलीसोबत कायमची भारतात परतली आहे. पण अजूनही मृणालचा चाहतावर्ग तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहतो आहे. काही दिवसांपूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीत ती मालिकेत काम करायला उत्सुक आहे असं तिने म्हंटलं होतं.

तिच्या पुनरागमनाची उत्सुकता सगळ्यांच्या मनात असतानाच मृणालचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी सिरियल्स ऑफिशिअल या इंस्टाग्राम पेजने मृणालचा एका सेल्फी शेअर केलाय. ज्यात ती एक क्रू मेंबरबरोबर दिसत असून या फोटोला अँड वी आर बॅक ऑन सेट असं कॅप्शन देण्यात आलं आहे. मृणालच्या या फोटोमुळे मृणाल आता नव्या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

पण मृणाल कोणत्या मालिकेत काम करतेय हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. याबाबत कमेंट सेक्शनमध्ये तिचे चाहते अनेक तर्कवितर्क लढवताना दिसत आहेत. एका चाहत्याने म्हंटल आहे कि, "मृणाल स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करेल." तर एकाने म्हंटलं आहे कि, "अबोली मालिका संपणार आहे आणि मृणाल त्यानंतर येणाऱ्या नव्या मालिकेत दिसेल." तर एकाने "ती झी मराठी किंवा कलर्स मराठीवरील मालिकेत काम करेल असं म्हंटलं आहे." पण याबाबत अजून कोणतही अधिकृत वक्तव्य मृणालने केलं नाहीये.

Mrunal Dusanis Comments

कलर्स मराठीवरील 'हे मन बावरे' या मालिकेनंतर मृणालने चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. तिची ही अखेरची मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील तिची आणि शशांक केतकरची जोडी सगळ्यांनाच आवडली होती. तर या आधी मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना','अस्सं सासर सुरेख बाई','तू तिथे मी' या मालिकांमध्ये काम केलं होतं तर 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमातही मृणालने भूमिका साकारली होती.

मृणालला चार वर्षांची नुरवी नावाची मुलगी आहे तर तिचा नवरा नीरज एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT