Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande ESAKAL
Premier

VIDEO: मृण्मयीने खाल्ला आईचा ओरडा; देशपांडे सिस्टर्सचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande: काल म्हणजे 10 एप्रिलला वर्ल्ड सिबलिंग डे (Siblings Day) होता या निमित्ताने मृण्मयीने तिचा आणि गौतमीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

priyanka kulkarni

Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande: मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त प्रसिद्ध बहिणींची जोडी म्हणजे गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande). एकमेकींशी सतत भांडणाऱ्या पण एकमेकांवर तितकंच प्रेम करणाऱ्या या बहिणींची नोकझोक सोशल मीडियावरसुद्धा चर्चेत असते.

काल म्हणजे 10 एप्रिलला वर्ल्ड सिबलिंग डे (Siblings Day) होता या निमित्ताने मृण्मयीने तिचा आणि गौतमीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये गौतमी मृण्मयीकडून डोकं थोपटून घेताना दिसतेय पण गौतमीने तसं करणं थांबवल्यावर त्यांची मारामारी होते आणि आई मृण्मयीला ओरडते हे पाहायला मिळालं.

पहा व्हिडीओ:

मृण्मयी आणि गौतमीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

मृण्मयीने या व्हिडिओला "आजच्या दिवशी हे तर post केलंच पाहिजे", सर्व लहान भावंडांना अर्पित असं कॅप्शन दिलंय. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एक युजरने तर चक्क "या दोघी नवऱ्याच्या घरी राहत नाहीत का?" असा प्रश्न विचारला त्यावर गौतमीने उत्तरादाखल हसण्याचे इमोजी शेअर केले. तर एकाने "यांची भांडणं कधी संपायची?" असा प्रश्न केला.

याआधीही मृण्मयी आणि गौतमीने एकमेकींसोबत भांडण करतानाचे, मस्ती करतानाचे व्हिडीओज शेअर केले होते. त्यांचे तेही व्हिडीओज व्हायरल झाले होते.

गौतमीने स्वानंदसोबत बांधली लग्नगाठ

काही महिन्यांपूर्वीच गौतमीने स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधली. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला. तिच्या लग्नानंतर मृण्मयीने सोशल मीडियावर तिच्यासाठी लिहिलेली इमोशनल पोस्ट चर्चेत होती.

मृण्मयीने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी, सुभेदार, नटसम्राट हे तिचे सिनेमे खूप गाजले. चंद्रमुखी सिनेमातील तिने साकारलेली डॉली देशमाने ही भूमिका सगळ्यांना खूप गाजली. तिचा या सिनेमातील अभिनय सगळ्यांना आवडला. मनफकिरा या सिनेमाचं तिने लेखन दिग्दर्शन केलं होतं पण लॉकडाऊनमुळे हा सिनेमा फार चालला नाही. आणि आता ती स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सिनेमात ती बापूजींच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर मृण्मयीची बहीण गौतमीने मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'सारे तुझ्याचसाठी' या सोनी मराठीवरील मालिकेत तिने पहिल्यांदा काम केलं. या मालिकेत तिने हर्षद अतकरीसोबत काम केलं. त्यानंतर ती झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील तिची आणि विराजसची जोडी सगळ्यांना खूप आवडली. या मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा खूप गाजलं. गौतमी एक उत्तम गायिका सुद्धा आहे. सोशल मीडियावर ती कायम तिने गायलेल्या गाण्यांचे रील्स शेअर करत असते. हे रील्स चाहत्यांना खूप पसंत पडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT