Aditya Sarpotdar Esakal
Premier

Munjya : चार पिढ्या सिनेइंडस्ट्रीत आणि सिनेमागृहात गेलेलं बालपण ; मुंज्याचा दिग्दर्शक आदित्यने उलगडला त्याचा भूतकाळ

Director Aditya Sarpotdar revealed his past : मुंज्या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या लहानपणीच्या खास आठवणी शेअर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

Munjya Movie : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे आणि या सिनेमासाठी त्यांचं सगळीकडे कौतुक होतंय. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या.

लहानपणीच बनायचं ठरवलं फिल्ममेकर

रेडीफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य यांना तुझ्या घरी फिल्म मेकिंगचा वारसा आहे. तू चौथ्या पिढीतला असून हा वारसा पुढे नेतोयस. लहान असताना तुला सिनेमाविषयीचं आकर्षण कसं होतं ? त्यावर ते म्हणाले कि,"माझे आजोबा एन डी सरपोतदार हे सिने निर्माते आणि दिग्दर्शक होते ज्यांनी १९२७ मध्ये आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली आणि ४० हुन अधिक सिनेमे बनवले. माझं पूर्ण बालपण हे सिनेमाच्या अवतीभवती गेलंय. मी मूळचा पुण्याचा आहे. तिथे आमच्या मालकीचे दोन थिएटर्स होते. सुट्टीच्या काळातील माझा सगळं वेळ हा थिएटरमध्ये, प्रोजेक्शन रुममध्ये आणि बॅक ऑफिसमध्ये घालवलाय. खूप लहान असतानाच आला कळलं होतं कि मला नेमकं काय करायचं आहे. मी सिनेमाचं जग इतकं जवळून पाहिलंय कि मी इतर कशाचाही विचार करू शकलो नाही. जेव्हा तुम्ही सिनेमा पाहताना आणि ते कसे बनवले जातात आणि कॅमेऱ्यामागे घडणारी ही सगळी जादू हे सगळं पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही. मी १५-१६ वर्षांचा असल्यापासून शॉर्ट फिल्म्स बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून मला खात्री होती कि मला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. "

आदित्य यांची कारकीर्द

आदित्य यांनी उलाढाल या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर सतरंगी रे, क्लासमेट्स, नारबाची वाडी, फास्टर फेणे, माऊली, झोंबिवली या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. तर मुंज्या बरोबरच काकुडा या हिंदी सिनेमाचंही दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा झी 5 वर १२ जुलै २०२४ला ओटीटीवर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT