Munjya Teaser sakal
Premier

Munjya Teaser: "मुन्नी बदनाम हुई गाणं ऐकायला तो आला अन्..."; 'मुंज्या' चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलात?

Munjya Teaser Out: एका नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव मुंज्या (Munjya) असं आहे.

priyanka kulkarni

Munjya Teaser Out: हॉरर चित्रपट बघायला अनेकांना आवडते. तुंबाड, कांतारा, स्त्री या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अशातच आता एका नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव मुंज्या (Munjya) असं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मुन्नी बदनाम हुई गाणं ऐकायला तो आला अन्...

स्त्री और भेडिया या चित्रपटाच्या यशानंतर निर्माता दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांची जोडी आता मुंज्या हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मुंज्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरच्या सुरुवातीला एका क्रीचर जंगलात लपलेला दिसत आहे. या क्रीचरच्या कानावर सलमान खानच्या दबंग या सुपरहिट चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई हे गाणे पडते. मुन्नी बदनाम हुई हे गाणे ऐकताच तो क्रीचर पळू लागतो. त्यानंतर तो एका घराबाहेर जातो. त्या घराच्या टीव्हीमध्ये मुन्नी बदनाम हुई हे गाणे लावलेले असते. अचानक टीव्ही बंद होते. टीव्ही बंद होताच तो क्रीचर ओरडतो, असं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

आता त्या क्रीचरचं आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्याचं नेमकं कनेक्शन काय आहे? हे आता प्रेक्षकांना मुंज्या हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.

शर्वरीनं शेअर केला टीझर

अभिनेत्री शर्वरी वाघनं मुंज्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "मुन्नी सावधान हो! मुंज्या येत आहे! Gen Z मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी स्त्रीचे निर्माते तुमच्यासाठी कॉमेडी आणि हॉरर यांचा परर्फेक्ट कॉम्बो घेऊन येतात!"

पाहा टीझर

मुंज्या या चित्रपटाचा ट्रेलर तीन दिवसांनी रिलीज होणार आहे, असंही शर्वरीनं पोस्टमध्ये सांगितलं आहे.

कधी रिलीज होणार मुंज्या?

मुंज्या हा चित्रपट 7 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT