Sobhita Dhulipala Esakal
Premier

Sobhita Dhulipala: सावळ्या रंगामुळे पचवले हजारो नकार पण.. नागार्जुन यांची नवी सून आहे समांथाप्रमाणेच तगडी अभिनेत्री

Sobhita Dhulipala Struggle Story: नागार्जुन यांची नवी सून आणि नागा चैतन्यची होणारी बायको त्याच्या पहिल्या बायको समंथाप्रमाणेच एक तगडी अभिनेत्री आहे. सिनेविश्वातील तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Entertainment News : सगळीकडे चर्चा आहे ती दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धूलिपाला (Sobhita Dhulipala) यांच्या साखरपुड्याची. शोभिता (Sobhita Dhulipala) सध्या वेब विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अनेक वेबसिरीज गाजल्या आहेत. पण हे यशाचं शिखर गाठण्यासाठी शोभिताने आजवर अनेक नकार पचवले आहेत.

मॉडेलिंगमधून पदार्पण

२ ० १ ० मध्ये शोभिताने तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. यामध्ये तिला कोणाचाही सपोर्ट नव्हता. स्वबळावर तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं. २ ० १ ३ मध्ये ती मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेली होती. तर अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी तिला बराच स्ट्रगल करावा लागला.

सावळ्या रंगामुळे मिळाला नकार

शोभितच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा तिला नकाराचा सामना करावा लागल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिच्या सावळ्या रंगामुळे अनेक जाहिरातींच्या ऑफर्स तिला नाकारण्यात आल्या. याबद्दल सांगताना ती म्हणाली कि,"जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ती एक लढाई असते. मी कधीच सिनेक्षेत्रात काम केलं नव्हतं पण मला आठवतंय कि माझ्या जाहिरातीच्या अनेक ऑडिशन्समध्ये मला सांगण्यात आलं कि मी गोरी नाहीये किंवा जाहिरातीत जसे हवी तशी मी सुंदर नाहीये. या गोष्टी मला माझ्या तोंडावर सांगण्यात आल्या होत्या."

सिनेमा आणि वेबसिरीज

शोभिताने अनुराग कश्यपच्या 'रमण राघव २ .०' या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'शेफ', 'मेजर', 'कुरूप', 'घोस्ट स्टोरीज' या सिनेमांमध्ये काम केलं. पण तिला ओळख मिळाली ती वेब सिरीजमुळे. 'मेड इन हेवन' ही तिची वेबसिरीज सुपरहिट झाली. या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेली तारा खन्ना सगळ्यांना आवडली. याबरोबरच तिने 'द बार्ड ऑफ ब्लड' आणि 'द नाईट मॅनेजर' या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.

डेटिंगच्या चर्चा

गेले वर्षभर शोभिता आणि नागार्जुन डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. शोभिता ही मूळची हैदराबादची असून तिचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होती तर तिची आई शिक्षिका होती. ती एका तेलुगू कुटूंबातून आली आहे. सोशल मीडियावर शोभिता आणि नागा चैतन्यचे परदेशात फिरतानाचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते.

या आधी नागा चैतन्यने दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रूथ प्रभूशी लग्न केलं होतं पण २ ० २ १ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यावरून समांथाला बरंच ट्रोल करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT