Prasad Khandeka sakal
Premier

Prasad Khandekar: नम्रताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रसाद भडकला; "सबका बदला लेगा.."

सकाळ वृत्तसेवा

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम. गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमातील कलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं. या कार्यक्रमातील प्रेक्षकांची एक लाडकी जोडी म्हणजे नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. या जोडीचे स्किट्स प्रेक्षकांच्या खास आवडीचे आहेत. (latest marathi news )

हे साकारत असलेली कोहली फॅमिली असो किंवा इन्स्पेक्टर आणि सुरकीचं स्किट. त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. खऱ्या आयुष्यातही नम्रता आणि प्रसाद एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नुकतंच नम्रताने प्रसादचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

नम्रताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रसादचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसाद पेंगताना दिसतोय. तिने या व्हिडिओला सध्या गाजत असलेलं 'माझ्याशी ही नीट बोलायचं' हे रॅप लावलं आहे. "Sorry control नाही झालं पश्या हा audio खुप trend मध्ये आहे म्हणून मी हे पोस्ट करतेय

(btw हा व्हिडिओ jet lag मध्ये होतो आम्ही ऑस्ट्रेलियात तेव्हाचा आहे ) बाकी पश्या ला आळस येत नाही तो खूप उत्साही आहे 😂

माझं काही खरं नाही 😛" असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत प्रसादची खिल्ली उडवली. तर हा व्हिडीओ पाहून प्रसाद भडकला आहे आणि त्याने "रुको नम्रता इसका करारा जवाब मिलेगा ..... सबका बदला लेगा रे पश्या " असं म्हणत तो याचा बदला घेणार असल्याचं त्याने जाहीर केलं. यावर नम्रताने हसण्याचे इमोजी शेअर करत तिने हे बोलणं हसण्यावारी नेलंय अशी प्रतिक्रिया दिली.

नम्रता आणि प्रसादच्या नोकझोकवर नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. अनेकांनी "नम्रता आता तू तयार राहा" अशी कमेंट करत तिला सावधगिरीचा इशारा दिलाय. नम्रता आणि प्रसादची नोकझोक अनेकांनी एन्जॉय केली.

तसंच नम्रताचा लवकरच नाच गं घुमा हा सिनेमा रिलीज होतोय. १ मे २०२४ला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे तर मुक्ता बर्वेसुद्धा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा खूप रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT