gulabi sadi  esakal
Premier

Gulabi Sadi: म्हणून ती साडी गुलाबी आहे... संजू राठोडने सांगितली 'गुलाबी साडी' गाण्यामागची स्टोरी, म्हणाला- आधीसारखं...

Sanju Rathod On Gulabi Sadi Song Making: गुलाबी साडी या गाजलेल्या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड याने त्याच्या गाण्यामागची कथा सांगितली आहे.

Payal Naik

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सगळ्यात जास्त गाजणारं गाणं म्हणजे 'गुलाबी साडी'. या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं. सोशल मीडियावर हिट ठरलेल्या या गाण्यावर सर्वसामान्यांसह कित्येक मराठी कलाकारांनी रिल्स बनवल्या. सगळेच या गाण्यावर ठुमके लागवताना दिसले. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. इतकंच नाही तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातदेखील हे गाणं वाजवलं गेलं. संजूने सगळ्यांना आपल्या गाण्यावर नाचवलं. मात्र हे गाणं त्याला सुचलं तरी कसं? नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे.

संजू राठोड याने नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वतः सई ताम्हणकरने त्याला गाण्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर हे गाणं आपल्याला कसं सुचलं हे त्याने सांगितलं आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'मी कोणालाही समोर ठेवून हे गाणं लिहिलेलं नाही. मी सगळ्या स्त्रियांना उद्देशून हे गाणं लिहिलं आहे. माझ्या आईला सुद्धा गुलाबी रंग खूप जास्त आवडतो. अर्थात जे सर्वांना आवडणार असंच काहीतरी मला करायचं होतं… म्हणून, या संकल्पनेला धरून गाण्याची निर्मिती केली. मी नेहमी गाणं लिहितानाच त्याला कंपोझ करत असतो. माझ्या डोक्यात एक धून आधीच तयार असते त्याला अनुसरुन मी गाण्याच्या पुढच्या ओळी लिहितो. त्यानंतर मग मी हे संपूर्ण गाणं थोडक्यात तयार करून गौरवला देतो. त्याने एका तासात या गाण्याची चाल लिहिली होती. गौरव हा आमचा म्युझिक प्रोड्युसर आहे.

संजूच्या गाण्याबद्दल बोलताना गौरव म्हणाला, 'आधी आमचं ‘नऊवारी साडी’ गाणं व्हायरल झालं होतं. त्यामुळे जेव्हा गाणं पाहिलं तेव्हा मला असं वाटलं अरे पुन्हा कसं याने साडीवर गाणं राहिलं. मी त्याला यावेळी साडी नको काहीतरी वेगळं ट्राय करू असं देखील म्हणालो होतो. पण, दादा ठाम होता. एकंदर सगळा विचार करून मी हे गाणं एका तासात बसवलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT