Navra Maza Navsascha 2 Esakal
Premier

Navra Maza Navsacha 2 : चला ना गडे... एसटी नाही तर कोकण रेल्वेने ; 'या' तारखेला रिलीज होणार 'नवरा माझा नवसाचा2'

Navra Maza Navsacha released date announcement : नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Navra Maza Navsacha 2 : सचिन पिळगावकर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित सिनेमा नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाची रिलीज डेट सिनेमाचा टीझर शेअर करत जाहीर करण्यात आली. पण यावेळी गोष्टींमध्ये ट्विस्ट आहे. यावेळी एसटी नाही तर कोकण रेल्वेने प्रवास करून नवस फेडला जाणार आहे. देवाचा नवस फेडण्यासाठी करावी लागणाऱ्या धडपडीचा पुन्हा एकदा आगळीवेगळी धमाल प्रेक्षकांना या सिनेमातून अनुभवता येणार आहे.

सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर,अशोक सराफ, हेमल इंगळे, स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. २० सप्टेंबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त या सिनेमात आणखी कोण कास्ट असणार हे जाहीर करण्यात आलं नाहीये. तब्बल १९ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पहा टीझर :

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. नवरा माझा नवसाचा या सिनेमात बस कंडक्टर झालेले अशोक सराफ यावेळी टीसी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे यंदा प्रवाशी विरुद्ध टीसी ही जुगलबंदी कशी रंगणार ही गंमत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते. सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेत सिनेमाच्या टीमने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली. "नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा 2" मध्ये नक्की असा कोणता नवस फेडायचा आहे ज्यामुळे कुटूंब रेल्वेने प्रवास करतंय याची मनोरंजक गोष्ट पाहायला मिळेल. हा सिनेमा बघण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Bhimashankar Temple: भाविकांसाठी मोठी बातमी! श्रावणात भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत खुले राहणार; ऑनलाइन बुकिंग

IND vs SL Test : श्रीलंकेने कसोटी संघ का जाहीर केलेला नाही? दोन खेळाडूंनी वाढवली डोकेदुखी; ४ दिवसावर पहिली कसोटी अन्...

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

SCROLL FOR NEXT