Panchayat 3 sakal
Premier

Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

Vacancy in Panchayat 3: नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Neena Gupta Share Post: ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'पंचायत' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही सीझन्सचं अनेकांनी कौतुक केलं. आता या वेब सीरिजच्या तीसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'पंचायत-3' (Panchayat 3) या वेब सीरिजच्या रिलीज डेटची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. अशातच आता या वेब सीरिजबाबत अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नीना गुप्ता यांची पोस्ट

पंचायत सीझन-3 ही वेब सीरिज 28 मे पासून Amazon Prime वर स्ट्रीम होणार आहे. याआधी आता सीरिजमधील फुलेरा येथील पंचायत सचिवाची जागा आता रिक्त झाली आहे. नीना गुप्ता यांनी फुलेरा गावाच्या सचिवाच्या जागेच्या व्हेकन्सीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. "फुलेरा नवा सचिव शोधत आहे. तुम्ही होणार का फुलेरी गावाचे सचिव, तुमच्या सीव्ही पाठवा!", असं या पोस्टरवर लिहिलेलं दिसत आहे.

"गली गली में शोर है, फुलेरा को नये सचिव की खोज है! अपना सीव्ही भेजें", असं कॅप्शन नीना गुप्ता यांनी पोस्टला दिलं आहे. अशातच आता फुलेरा गावाचा नवा सचिव कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता जितेंद्र कुमारनं पंचायत या वेब सीरिजमध्ये फुलेरा गावाचा सचिव अभिषेक त्रिपाठी यांची भूमिका साकारली. अशातच आता सीझन-3 मध्ये फुलेरा गावाचा सचिव कोण होणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

17 मे रोजी पंचायत या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज होणार आहे आणि 28 मे रोजी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT