priyanka chopra 
Premier

Priyanka Chopra Birthday: प्रियांकाच्या वाढदिवसाला निक जोनासने शेअर केले 'ते' फोटो, बायकोसाठी लिहिला खास मेसेज

Priyanka Chopra Nick Jonas: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीच आज वाढदिवस आहे. त्यामुळे निक जोनास याने तिचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

Payal Naik

बॉलीवुडच नाही तर हॉलीवुडला जिने वेड लावलं अशी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करतेय. प्रियांकावर तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावरही तिचे चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत. यातच एका खास व्यक्तिने तिच्यासाठी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आहे तिचा पती निक जोनास. निक जोनासने प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे.

निकने या पोस्टमध्ये प्रियांकाचे काही खास फोटो शेयर केले आहेत, ज्यात प्रियांकाचे निकसोबतचेही काही रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये एका फोटोने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. एका फोटोत निक आणि प्रियांकाचा किस करतानाचा फोटो दसतोय. तर एका फोटोत समुद्रकिनारी दोघांनी हातात हात घेतलाय. निक-प्रियांकाचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

या पोस्टमध्ये निक लिहीतो की, "तू जी स्त्री आहेस, मी किती नशीबवान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझं प्रेम."अतीशय रोमँटिक अंदाजात निकने प्रियांकासाठी असलेलं प्रेम व्यक्त करत तिला या खास दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेत असलेलं लोकप्रिय कपल आहे. सोशल मिडीयावरही दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे.

सोशल मिडीयावरही निक आणि प्रियांकाने त्यांच्या फोटो आणि व्हिडीओतून अनेकदा कपल गोल्स दिलेत. नजर न लागो अशी या दोघांची जोडी असून चाहत्यांना त्यांचे एकत्र फोटो पाहायला आवडतात. निकच्या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील प्रियांका झळकली होती. निक जोनासच्या सकर या व्हिडीओ अल्बममध्ये प्रियांकाने काम केलं होतं. तर अनेकदा विविध पुरस्कार सोहळ्यात आणि कार्यक्रमांमध्ये प्रियांका आणि निक एकत्र पाहायला मिळतात. निक जोनासच्या म्युझिक कॉन्सर्टला तर प्रियांका आवर्जुन उपस्थित राहताना दिसते.

निक जोनास आणि प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये भारतातच लगीनगाठ बांधली होती. जोधपुर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडलाहोता. २०२२ मध्ये सरोगसीच्या आधारे निक आणि प्रियांकाच्या घरी छोटी पाहुणी आली. या बाळाचं नाव त्यांनी मालती मेरी असं ठेवलं. सोशल मिडीयावरही निक आणि प्रियांकाने आपल्या गोंडस मुलीचे फोटो अनेकदा शेयर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT