On the occasion of Labor Day, just listen to these popular songs of Bollywoo esakal
Premier

Labor Day: कामगार दिना निमित्त 'ही' बॉलिवूडची गाजलेली गाणी एकदा ऐकाच...

Vaishali Patil

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोक हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा मोठ्या उत्साहात साजरा करतात. यादिवशी महाराष्ट्रात कामगार दिनदेखील साजरा केला जातो.

खरं तर कामगार दिन हा कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका चळवळीतून सुरुवात झाला. 19व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका चळवळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चळवळीतून कामगारांच्या मागण्या पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आल्या. 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी आपल्या मागण्या सांगितल्या. कामगाऱ्यांचे दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत, या मागणीसाठी आंदोलन झाली. त्यानंतर 1 मे ला महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा करण्यास सुरवात झाली.

(On the occasion of Labor Day, just listen to these popular songs of Bollywood)

मनोरंजन विश्वात नेहमीच चित्रपट किंवा नाटकाच्या माध्यातुन समाजातील अयोग्य गोष्टींवर भाष्य केलं जातं. तसंच काहीस बॉलीवूडच्या काही जुन्या चित्रपटांमधुनही मजूरांवर होणारा अन्याय त्याचा संघर्ष यांवर भाष्य केलं जायचं. असेच काही चित्रपट आणि त्यांची गाणी आजही खुप प्रसिद्ध आहे. कामगारांवर आधारित काही गाणी खूप हिट झाली जी आजही लोक आवडीने ऐकतात.

साथी हाथ बढाना ( नया दौर):

1957 साली प्रदर्शित झालेला नया दौर हा चित्रपट खुप लोकप्रिय झाला. सुपरस्टार दिलीप कुमार आणि वैजंयती माला यांच्या याच चित्रपटातील नया दौर मधील साथी हाथ बढाना हे गाणं आजही लोकप्रिय आहे. साथी हाथ बढाना...'एक अकेला थक जाएगा तो मिलकर बोझ उठाना' अशा शब्दात मजूरांचे कष्ट आणि त्यांच्यातील उत्साहाचं वाढवण्यासाठी हे गाणं वाजवलचं जात. पूर्वीच्या काळी हे गाणं खूपच गाजलं होतं. आजही कामगार दिनाच्या कार्यक्रमात हे गाणं आवर्जून लावलं जातं.

दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा ( मदर इंडिया)

'दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा' हे गाणं कोणी ऐकलं नसेल असं होउच शकत नाही. हे गाण मदर इंडिया चित्रपटातील आहे. त्या काळात मजूरांवर किती अन्याय अत्याचार व्हायचा त्याच्या संघर्षाचे भीषण वास्तव यागाण्यातुन दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात नरगिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांनी काम केले होते.

मेहनतकश इंसान जाग उठा ( इंसान जाग उठा)

सुनिल दत्त आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असलेला इंसान जाग उठा हा चित्रपट 1959 साली प्रदर्शित झाला. तो चित्रपट फार गाजला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५९ मध्ये इंसान जाग उठा नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्या चित्रपटात सुनिल दत्त आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील 'मेहनतकश इंसान जाग उठा' एक गाणं हे खास कामगारांच्या जीवनावर आधारित आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणं लोकप्रिय ठरलं.

ठहर जरा ओ जानेवाले (बूट पॉलिश) :

आशा भोंसले, मन्ना डे, मधुबाला झावेरी यांनी गायलेल हे गीत 1954 एक चित्रपट प्रदर्शित झालेल्या ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल मनाला भिडणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT