Orry esakal
Premier

Orry: एक फोटो काढण्यासाठी अन् इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी किती घेतो मानधन? ओरीनं अखेर सांगूनच टाकलं

Orry: एका मुलाखतीत ओरीनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. तसेच ओरीनं या मुलाखतीत त्याच्या मानधनाबद्दल देखील भाष्य केलं आहे.

priyanka kulkarni

Orry: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ओरीची (Orry) चर्चा होत आहे. ओरीचं खरं नाव ओरहान अवात्रामणी असं आहे. ओरी हा लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या अनेक सेलिब्रिटींना टक्कर देत आहे. ओरी विविध पार्ट्यांमध्ये तसेच इव्हेंटमध्ये हजेरी लावत असतो. या पार्ट्यांमधील फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. ओरीची अनेक सेलिब्रिटींसोबत मैत्री आहे. ओरी नेमकं काय काम करतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण एका मुलाखतीत ओरीनं तो 'लिव्हर' असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता एका मुलाखतीत ओरीनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. तसेच ओरीनं या मुलाखतीत त्याच्या मानधनाबद्दल देखील भाष्य केलं आहे.

ओरीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी भारती म्हणाली की, ओरीने कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही, तरीही त्याने एका वर्षात बरीच प्रसिद्ध मिळाली. यावेळी भारतीनं ओरीला त्याच्या मानधनाबद्दल देखील विचारलं. यावेळी ओरी म्हणाला, "मी एक फोटो काढण्यासाठी 20 लाख रुपये घेते आणि इव्हेंटमध्ये हजेरी लावण्यासाठी 25 लाख मानधन घेतो."

ओरीनं 'बिग बॉस 17' मध्ये देखील हजेरी लावली होती. यावेळी देखील सलमान खानसोबत गप्पा मारताना ओरीनं त्याच्या मानधनाबद्दल सांगितलं होतं.

ओरीची सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ओरी हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT