OTT Release This Weekend esakal
Premier

OTT Release This Weekend: 'अनदेखी 3', मर्डर इन माहिम अन् आवेशम; वीकेंडला घरबसल्या पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release This Weekend: विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.

priyanka kulkarni

OTT Release This Weekend: यंदा वीकेंडला (Weekend) प्रेक्षकांना ओटीटीवर (OTT) मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यात विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही घरबसल्या आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्र-मैत्रिणींसोबत पाहू शकतात. जाणून घेऊयात ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल...

योद्धा- ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री राशि खन्ना आणि दिशा पटानी यांचा योद्धा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता.

आवेशम- ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ

अभिनेता फहाद फासिलचा आवेशम हा मल्याळम चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. जीतू माधवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मर्डर इन माहिम- जियो सिनेमा


लेखक जेरी पिंटो यांच्या पुस्तकावर आधारित असणारी 'मर्डर इन माहिम' ही वेब सीरिज जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.या वेब सीरिजमध्ये आशुतोष राणा, शिवाजी साटम, विजय राज हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

'अनदेखी 3'- सोनी लिव्ह

आशिष आर शुक्लाच्या 'अनदेखी 3' या वेब सीरिजमध्ये हर्ष छाया, वरुण बडोला, सूर्या शर्मा, अंकुर राठी, आंचल सिंग, एन झोया आणि शिवांगी सिंग या कलाकारांच्या भूमिका आहेत. 'अनदेखी 3' ही वेब सीरिज 10 मे रोजी सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT