Hania Amir With Badshah esakal
Premier

Hania Amir With Badshah: दुबईत पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला 'बादशाह'; डेटिंगच्या चर्चांना उधाण

Hania Amir With Badshah: हानिया आणि बादशाह यांच्या दुबई ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

priyanka kulkarni

Hania Amir With Badshah: हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बादशाह आणि पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Amir) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकतेच हानियानं बादशाहसोबतचे (Badhshah) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हानिया आणि बादशाह हे दोघे दुबई ट्रीप एन्जॉय करताना दिसत आहेत. हानिया आणि बादशाह यांच्या दुबई ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हानियानं शेअर केले फोटो

हानिया आमिरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बादशाहसोबत दिसत आहे. हानियाने फोटोमध्ये तिच्या आणि बादशाहच्या शॉपिंग डेट आणि डिनरडेटची झलक दाखवली आहे. या फोटोला हानियानं कॅप्शन दिलं, 'चंदीगडहून रेसक्यू आला आहे'

हानिया आणि बादशाहच्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

हानियाने एक क्यूट आणि मजेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बादशाह आणि ती गाणी गाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हानिया म्हणते की, हे बादशाहचं कॉन्सर्ट आहे आणि मी एक प्रेक्षक आहे. यानंतर दोघेही हसताना.या व्हिडीओला हानियानं कॅप्शन दिलं, 'कॉन्सर्ट टाइम'.

बादशाह आणि हानिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाहीये. पण त्यांच्या डेटिंगची चर्चा मात्र सध्या सोशल मीडियावर होत आहे.

बादशाहची 2024 मध्ये बरीच गाणी रिलीज झाली. ज्यात डाकू, सोलमेट, गॉड डॅम आणि ओ सजना यांचा समावेश आहे. तर हानिया ही पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इश्किया, मेरे हमसफर, तितली, फिर वही मोहब्बत या मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Leader Arrested : मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप; अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवले अन्...

Inspiring Journey: देशाचे नाव उंचाविण्यासाठी आईचे मंगळसूत्र गहाण; दिव्यांग ‘संघर्षकन्या’ भाग्यश्री जाधवच्या नावावर ३४ पदकांची कमाई

Raj Thackeray : राज ठाकरे रायगडावरून करणार सदस्य नोंदणीला सुरुवात; वर्धापन दिनापूर्वी कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश

Women's Day: एका डोळ्याची दृष्टी गेली, तरीही एमपीएससी क्रॅक! उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे यांची प्रेरणादायी कहाणी

Chandrashekhar Bawankule: अमरावतीची पालकमंत्री महिला होणार; ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जागतिक महिला दिनी घोषणा

SCROLL FOR NEXT