Panchayat 3 sakal
Premier

Panchayat 3: पंचायतमधील रिंकीच्या मैत्रिणीला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना; म्हणाली, "अत्यंत अपमानास्पद..."

Aanchal Tiwari: एका मुलाखतीमध्ये आंचलनं तिला आयुष्यात आलेल्या विविध अनुभवांबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Panchayat 3: 'पंचायत- 3' (Panchayat 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या वेब सीरिजची कथा आणि या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये रिंकीची मैत्रिण रवीनाची भूमिका साकारणारी आंचल तिवारी (Aanchal Tiwari) ही सध्या चर्चेत आहे. पंचायत या वेब सीरिजमुळे आंचलला विशेष लोकप्रियता मिळाली. आंचलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, अशातच एका मुलाखतीमध्ये आंचलनं तिला आयुष्यात आलेल्या विविध अनुभवांबद्दल सांगितलं आहे.

अभिनयाची आवड अन् ऑडिशनमध्ये सिलेक्शन

मुलाखतीत आंचल तिवारीनं तिच्या बालपणाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "मी मी प्रयागराज, उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. माझे बालपण तिथेच गेले. मी मध्य प्रदेशातून शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच मला डान्स आणि अॅक्टिंगची आवड होती. मी लहानपणी अॅक्टिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं पण माझे आई-वडील म्हणायचे की, मी माझ्या अभ्यासात लक्ष द्यावे, पण माझे मन अभिनयाकडे धावत होते. एकदा ग्वाल्हेरमध्ये ऑडिशन होत होती. मला वाटले की, हे एका टीव्ही शोचे ऑडिशन आहे. पण ते थिएटरसाठी होतं. ग्वाल्हेर येथील ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं."

पहिली मालिका

मुलाखतीत आंचलनं तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "2018 मध्ये, मला माझी पहिली टीव्ही मालिका मिळाली. पण ती भूमिका खूपच छोटी होती, पण मी पैशासाठी त्यात काम केलं."

कास्टिंग काऊचचा अनुभव

आंचलनं मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "एकदा मला एका टीव्ही सीरियलसाठी कॉम्प्रमाइज करण्यास सांगितले होते. त्यावेळी मला हा शब्द देखील माहीत नव्हता. मला खूप वाईट वाटलं. मी खूप रडले. हे अत्यंत अपमानास्पद आहे. मला वाटले की, मी चुकीच्या क्षेत्रात आले आहे. पण माझा देवावर विश्वास आहे. देवाने मला साथ दिली."

निधनाची अफवा

काही दिवसांपूर्वी आंचलच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. याबद्दल आंचलनं सांगितलं, "काही दिवसांपूर्वी आंचल तिवारी नावाच्या एका भोजपुरी अभिनेत्रीचे निधन झाले. लोकांना वाटलं की, ती आंचल मी आहे. अनेक माध्यमांनी माझा फोटो शेअर करुन माझ्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. त्यानंतर अचानक काय झाले म्हणून सगळे घाबरले. आईने मला फोन केला. माझे वडील दम्याचे रुग्ण आहेत. घरात गोंधळ उडाला. मग मला राग आला. त्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करून सर्वांना सत्य सांगितले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT