Panchayat 3 Trailer sakal
Premier

Panchayat 3 Trailer: ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार पंचायत-3 चा ट्रेलर

Panchayat 3 Trailer: पंचायत-3 या वेब सीरिजचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Panchayat 3 Trailer: ओटीटीवर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज प्रेक्षक बिंच वॉच करतात. ओटीटीवरील 'पंचायत' या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत-3 (Panchayat 3) वेब सीरिजच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता या वेब सीरिजच्या टीमनं वेब सीरिजच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. पंचायत-3 या वेब सीरिजचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

कधी रिलीज होणार पंचायत-3 चा ट्रेलर?

'पंचायत' या वेब सीरिजची निर्मिती TVF म्हणजेच The Viral Fever नावाच्या प्रोडक्शन कंपनीनं केली आहे. 'पंचायत' या वेब सीरिजचं एक पोस्टर शेअर करुन TVF नं या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'ट्रेलरची डेट लॉक झाली आहे.' या पोस्टरच्या वर लिहिले आहे की, 17 मे रोजी 'पंचायत 3' चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

वेब सीरिजचं हटके प्रमोशन

पंचायत-3 या वेब सीरिजच्या टीमनं या वेब सीरिज प्रमोशन हटके पद्धतीनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,भाजी मंडईतील दुधीभोपळ्यांवर पंचायत वेब सीरिजचं नाव आणि रिलीज डेट लिहिली आहे.

'या' दिवशी ओटीटीवर रिलीज होणार वेब सीरिज

दीपिक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पंचायत' या वेब सीरिजचा तिसरा सीझन 28 मे रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय, सान्विका आणि नीना गुप्ता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षक 'पंचायत' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT