Paresh Rawal sakal
Premier

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

Lok Sabha 2024 elections: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh RawaL) यांनी मतदान न करणाऱ्यांना शिक्षा असावी, असं सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Lok Sabha 2024 elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024 elections) पाचव्या टप्प्याचं मतदान सध्या सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहे. कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न करणाऱ्यांना शिक्षा असावी, असं सांगितलं आहे.

काय म्हणाले परेश रावल?

मतदान केल्यानंतर परेश रावल यांनी ANI सोबत संवाद साधले. यावेळी त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आणि मतदान न करणाऱ्यांना काही तरी शिक्षा झालीच पाहिजे असेही सांगितले. ते म्हणाले, "मतदान न करणाऱ्यांसठीकाही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा."

'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

जान्हवी कपूर, धर्मेंद्र, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण या कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिलं," भारतीय असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुमचे मत, मित्रांनो, या अधिकाराचा लाभ घ्या, तुमचे मत नक्की द्या..."

मतदान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, "माझी इच्छा आहे की, माझा भारत देश हा विकसित आणि सशक्त व्हावा. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. लोकांना जो व्यक्ती योग्य वाटेल त्यालाच त्यांनी मतदान करावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : धामणगाव येथे नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

SCROLL FOR NEXT