Premier

Pokémon : पोकेमॉनची नवी सीरीज येणार बच्चेकंपनीच्या भेटीला; विशाल-शेखर, अरमान मलिक अन् शर्ली सेटियाने गायलंय थीम साँग

या नवीन सीरिजमध्ये खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींबरोबरच नवीन पात्रं घालण्यात आली आहेत. त्यात एअरशिपचं नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन पिकाचूला (Pikachu) पाचारण करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pokémon Horizons on Hungama : पोकेमॉन या लोकप्रिय अ‍ॅनिमे सीरीजचा नवा सीझन ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ हंगामावर 25 मे पासून प्रदर्शित होणार आहे. हंगामा चॅनलने याबाबतची घोषणा केली आहे. यासोबतच यामधील ओरिजिनल ओपनिंग आणि एंडिंग साऊंडट्रॅकचे अनावरण देखील करण्यात आले. प्रसिद्ध संगीतकार विशाल शेखर यांनी हे साऊंडट्रॅक तयार केले आहेत. याला अरमान मलिक आणि शर्ले सेटिया यांचा आवाज आहे.

या नवीन सीरिजमध्ये खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींबरोबरच नवीन पात्रं घालण्यात आली आहेत. त्यात एअरशिपचं नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन पिकाचूला (Pikachu) पाचारण करण्यात आले आहे. भारतीय कलाकार आणि पोकेमॉन कंपनीने मिळून ही कलाकृती तयार केली आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू अशा भाषांमधील ओपनिंग आणि क्लोजिंग ट्रॅकमुळे पोकेमॉन सीरिजला एक स्थानिक साज मिळाला आहे. हे थीम साँग्स विशेषत: भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आली आहे.

पोकेमॉन कंपनीबरोबर केलेल्या या कामाबद्दल बोलताना विशाल आणि शेखर म्हणतात, “जेव्हा आम्हाला पोकेमॉन कंपनीकडून काम करण्यासाठी फोन आला, तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही ब्रँडची ओळख असलेल्या, त्यात भरपूर आनंद आणि अँडव्हेन्चर असलेल्या चाली आम्ही रचल्या. आपल्या स्थानिक प्रेक्षकांना आवडावं यासाठी त्याला एक भारतीय चेहरा दिला. आम्हाला आशा आहे की जेव्हा लोक टीव्ही पासून दूर असतील तेव्हाही त्यांना या अ‍ॅनिमेटेड सीरिजची चाल आठवत राहील.”

अरमान मलिकही या कार्यक्रमाला उपस्थित होता. तो म्हणाला, “लहानपणी मी पोकेमॉन कार्ड्स खेळायचो. एक दिवशी याच सीरिजचं टायटल साँग हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये मला गायला मिळाले हे सगळं स्वप्नवत आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा पोकेमॉन पहाणे ही एक प्रथाच पडली होती. त्यामुळे हॉरिझॉन सीरिजसाठी त्याला आवाज देणे हा माझ्यासाठी फक्त सन्मानच नाही तर आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. विशाल शेखरने पोकेमॉनचा जागतिक पातळीवर असलेला प्रभाव ओळखून काही पारंपरिक आवाजही त्यात घातले आहे. ही चाल सगळ्या पिढ्यांना आपलीशी वाटेल अशी आहे. नाविन्य आणि नॉस्टॅलजिया यांचा संगम असलेल्या या सीरिजचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.

शर्ले सेटियानेही याप्रसंगी तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, “आपल्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या एखाद्या गोष्टीवर काम करणं हा सन्मानच आहे. मला पोकेमॉनचे सॉफ्ट टॉय आणि इतर वस्तू विकत घेणं आधीही आवडायचं आणि आताही आवडतं. या सीरिजसाठी गाणं हा माझ्यासाठी अतिशय अविश्वसनीय अनुभव होता. या चालीचा फॅन्सवर दीर्घकाळासाठी प्रभाव पडेल असं मला वाटतं.

या गाण्याचे गीतकार रश्मी आणि विराग म्हणाले, “पोकेमॉन शो साठी गाणी लिहिणं म्हणजे हा शो आमच्या मुलीबरोबर पुन्हा पाहिल्यासारखं वाटतं. आमच्या या गाण्यातून मुलांना आनंद मिळावा असं आम्हाला वाटतं.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : कुठेही गालबोट न लागू देता मिरवणुक पार पाडावी- अजित पवार

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

माेठी बातमी! 'शाळांना २० टक्के टप्पा अनुदानासाठी २० अटी'; प्रस्ताव ऑफलाइन अन्‌ आदेश मिळणार ऑनलाइन, अटी पूर्ततेची होणार खातरजमा

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

Asian Hockey Cup 2025 : भारत अंतिम फेरीपासून केवळ एक पाऊल दूर; आज चीनला हरविणे आवश्यक

SCROLL FOR NEXT